Join us

Fan Movment : वरुण धवनने केला विराट कोहलीसारखा हेअर कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2017 14:51 IST

अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे; मात्र यानिमित्त जेव्हा त्याला भारतीय क्रिकेट ...

अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे; मात्र यानिमित्त जेव्हा त्याला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला भेटण्याची संधी मिळाली, तेव्हा त्याने विराटचा तो किती मोठा फॅन आहे हे दाखविण्याची एकही संधी सोडली नाही. वरुणने विराटप्रमाणेच हेअर कट करून दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करीत विराटचा बिग फॅन असल्याचे दाखवून दिले. वरुणने ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाचे डायरेक्टर शशांक खेतान यांच्याबरोबरदेखील हा ‘फॅन मुव्हमेंट’ शेअर केला. यामध्ये वरुण आणि विराट एकाच सलूनमध्ये बसून हेअर कट करीत आहेत. हा फोटो जेव्हा वरुणने सोशल मीडियावर शेअर केला, तेव्हा नेटिझन्सकडून त्या फोटोला भरपूर हिट्स मिळत आहेत. या फोटोमध्ये वरुण आणि विराट कुठल्यातरी सलूनसमोर उभे असताना दिसत आहेत. दोघांचाही हेअर कट एकसारखाच दिसत आहे. जेव्हा वरुणने हा फोटो शेअर केला, तेव्हा त्याने विराट कोहलीचे भरभरून कौतुक करणाºया फोटो ओळी शेअर केल्या. वरुणने लिहिले की, ‘बद्री फक्त विराट कोहलीचाच फॅन आहे. जेव्हा मी माझ्या डायरेक्टरला विचारले की, बद्री कोणावर प्रेम करतो, तेव्हा शशांक खेतानने सांगितले विराट कोहली! मी स्वत:ला भाग्यशाली समजतो की, मला विराटसोबत हेअर कट करायला मिळाला. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, विराट खूपच विनम्र स्वभावाची व्यक्ती आहे. आज संपूर्ण देशाची धुरा त्याच्या खांद्यावर आहे; मात्र मी त्याचा फॅन यासाठी आहे की, चार वर्षांपूर्वी भेटलेला विराट आजही तसाच आहे. शशांक खेतान यांनी दिग्दर्शित केलेला ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ हा सिनेमा १० मार्च रोजी रिलिज होणार असून, त्याच्या प्रमोशनसाठी वरुण आणि आलिया भट्ट जागोजागी फिरत आहेत. या सिनेमाच्या प्रॉडक्शनचा जर विचार केला तर इंडस्ट्रीमधील तीन दिग्गज प्रोड्यूसर्सने एकत्र येऊन सिनेमाच्या निर्मितीत हातभार लावला आहे. हिरू यश जोहर, करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी प्रॉडक्शनची जबाबदारी पार पाडली आहे.