Join us

​ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका २५ वर्षांपासून राहाते आपल्या पतीपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 13:57 IST

अलका याज्ञिकने आजवर अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगली गाणी गायली आहेत. अलकाने गायलेली टिप टिप बरसा, आपके प्यार में, तौबा ...

अलका याज्ञिकने आजवर अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगली गाणी गायली आहेत. अलकाने गायलेली टिप टिप बरसा, आपके प्यार में, तौबा तुम्हारे इशारे, पहली बार, बोल चुडियाँ, मोहोब्बत हो ना जाये, तुमसे मिलना, ए मेरे हमसफर, हमको तुमसे प्यार है, गजब का है दिन, राजा को रानी से प्यार, कहो ना प्यार है, जिंदगी बन गये हो तुम यांसारखी गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली आहे. अलकाला तिच्या गाण्यांसाठी अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. Also Read : ​या कारणामुळे अलका याज्ञिकने आमिर खानला काढले होते खोलीबाहेरअलका याज्ञिकला बॉलिवूडमध्ये आघाडीच्या गायिकांपैकी एक मानले जाते. अलका अनेक वर्षांपासून या क्षेत्रात आहे. तिने आजवर अनेक गाणी गायली आहेत. अलकाचे लग्न १९८९ मध्ये नीरज कपूर सोबत झाले होते. नीरज हा एक प्रसिद्ध बिझनेसमन आहे. त्या दोघांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे. पण अलकाचे पती नीरज हे त्यांच्या कामानिमित्त शिलाँग येथे असतात. त्यांचा संपूर्ण व्यवसाय हा शिलाँग मध्ये आहे तर अलका याज्ञिक अधिकाधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गात असल्याने तिचे रेकॉर्डिंग हे मुंबईत असते. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तर ती तिच्या कामात प्रचंड व्यग्र होती. नव्वदीच्या दशकात तर अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला अलकाचा आवाज ऐकायला मिळाला. त्यामुळे त्याकाळात आठवड्यातून चार-पाच दिवस तरी तिचे गाण्याचे रेकॉर्डिंग असायचे. त्यामुळे अलकाला मुंबईत राहाण्याशिवाय पर्याय नव्हता. अलकाचे नवीन लग्न झाल्यानंतर देखील ती मुंबईत आणि नीरज शिलाँगमध्ये असेच असायचे. अलकाला रेकॉर्डिंगमधून वेळ मिळाला की, ती शिलाँगला जात असे तर नीरज यांना त्यांच्या कामातून वेळ मिळाल्यास ते मुंबईला येत असत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या दोघांच्या कामामुळे असेच सुरू आहे. त्यांची मुलगी सायशा देखील आता मोठी झाली आहे.अलका आज देखील बॉलिवूडमधील दिग्दर्शक, निर्मात्यांची लाडकी गायिका आहे. अनेक चित्रपटांमध्ये ती गाताना दिसते. तसेच अनेक रिअॅलिटी शो मध्ये ती हजेरी लावत असते. तसेच तिचे स्टज शो देशभर होत असतात. त्यामुळे आज देखील अलका तिच्या कामात तितकीच बिझी आहे. त्यामुळे त्यांचे आजदेखील असेच सुरू आहे.