सलमानपेक्षा अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांचे वाईट वाटते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 05:19 IST
माझा न्यायव्यस्थेवर विश्वाससलमान खानला मी चांगले ओळखतो. तो खूप चांगला माणूस आहे. त्यावेळी नक्की काय घडल आहे ...
सलमानपेक्षा अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांचे वाईट वाटते
माझा न्यायव्यस्थेवर विश्वाससलमान खानला मी चांगले ओळखतो. तो खूप चांगला माणूस आहे. त्यावेळी नक्की काय घडल आहे हे सांगता येणं तस अवघड आहे. पण माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मात्र त्या अपघातामध्ये जे लोक गेले त्यांच्याबद्दल देखील खूप वाईट वाटत आहे.- समीर धर्माधिकारी, अभिनेतान्यायव्यस्थेविरोधात बोलणे अवमान करण्यासारखेसलमानची निर्दोष मुक्तता ही गोष्ट योग्य की अयोग्य सांगता येत नाही. कारण त्याच्या केसमध्ये उच्च न्यायालयाने पुरावे आणि घटनांचा नक्कीच विचार केला असेल. हा निर्णय योग्य न वाटल्यास संबंधित व्यक्ती नक्कीच सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू शकतो. न्यायव्यस्थेच्या विरोधात बोलणे म्हणजे त्याचा अवमान करण्यासारखे आहे.- भार्गवी चिरमुले, अभिनेत्रीसलमानच्या निर्दोषमुक्ततेत तथ्य असावेसलमान खानची सगळ्यांसारखीच मी सुद्धा जबरदस्त फॅन आहे आणि महत्वाचे म्हणजे माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सलमानची जर निर्दोष मुक्तता झाली आहे तर नक्कीच त्यात काहीतरी तथ्य असेल आणि जर तो दोषी असेल तर पुढे त्याला त्याची शिक्षा मिळेलच.- गायत्री सोहम, अभिनेत्रीसलमान सुटणार हे माहितचं होतेज्याप्रमाणे चित्रपटात दाखवतात की खूप पैसा आणि पॉवर असल्यावर कधीच शिक्षा होऊ शकत नाही, तसचं झालं आहे. मीही त्याचा खूप मोठा फॅन आहे पण तो सुटणार हेच माहीत होतं.- सलील कुलकर्णी, गायक, संगीतकारअपघातग्रस्त कुटुंबियांबद्दल वाईट वाटतेसलमानची सुटका झाली यापेक्षा मला त्या अपघातात गेलेल्या माणसांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं वाईट वाटत. कारण त्यांच्या 13 वर्षाच्या लढयाचा कोर्टाने दीड मिनीटात निकाल दिला आणि ते लोक हरले. 100 अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये असे आपली न्यायव्यवस्था सांगत असल्यामुळे 100 निरपराधी अगदी सहज सुटतात आणि निरपराध्यांना अशा मार्गाने शिक्षा भोगावी लागते.- सचिन देशपांडे, अभिनेतासलमानच्या गुन्ह्याचे सर्मथन नाहीमी सलमान खानची चाहती आहे पण म्हणून त्याने लोकांना जे नुकसान पोहचवले आहे त्याचे मी कधीच सर्मथन करणार नाही. आपल्याकडे माणसं बोलले की असहिष्णुतेवर चर्चा होतात पण गुन्हे केले की एकतर निर्दोष किंवा पॅरोलवर सुटतात. याला काय म्हणूया? सहिष्णु न्यायव्यवस्था? हया सगळ्याला न्यायव्यवस्थाच जबाबदार आहे. सलमान खान बिईंग हयुमन नावाचा ब्रॅंड चालवतो, तो माणूस म्हणून चांगला असेलही कदाचित. पण त्याच्या हातून घडलेल्या गुन्ह्याला प्रूफ करण्यात कमी पडलेली माणसच यासाठी जबाबदार असल्याचे मी मानते.- तेजस्विनी पंडित, अभिनेत्री