Join us  

काय म्हणता, ‘दबंग 3’च्या कमाईचा आकडा खोटा?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 12:06 PM

... आणि सोशल मीडियावर FAKE DABANGG3 FIGURES ट्रेंड करू लागला.

ठळक मुद्दे‘दबंग 3’ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली होती.

बॉलिवूडचे ए-लिस्ट स्टार्स चित्रपटांच्या कमाईचे आकडे फुगवून सांगतात, हा आरोप तसा जुना. दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या ‘हाऊसफुल 4’वर असाच आरोप झाला होता. या चित्रपटाच्या कमाईचे आकडे खोटे आहेत, असा आरोप झाल्यानंतर खुद्द अक्षय कुमारला मीडियासमोर खुलासा द्यावा लागला होता. आता सलमान खानवरही असेच आरोप होत आहेत. होय, ‘दबंग 3’ या गत शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सिनेमाचे ओपनिंग डे कलेक्शनचे आकडे जारी झालेत आणि सोशल मीडियावर FAKE DABANGG3 FIGURES ट्रेंड करू लागला.

ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी ‘दबंग 3’ने पहिल्या दिवशी देशभर 24.5 कोटींची कमाई केली, असे ट्वीट केले. तरण यांच्या या ट्वीटवर केआरके अर्थात कमाल आर खान याने सर्वप्रथम आक्षेप घेतला. ‘हे फेक कलेक्शन आहे. माझ्याकडे फक्त दोनच शब्द आहेत, आ... थू... हे फेक कलेक्शनही चित्रपट फ्लॉप होण्यापासून वाचवू शकत नाहीत,’असे केआरकेने म्हटले.

त्यानंतर अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया देणे सुरु केले. अद्याप सलमान खान वा ‘दबंग 3’च्या मेकर्सने यावर कुठलेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे भाईजान यावर काय बोलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘दबंग 3’ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली होती. एकीकडे सलमानच्या डायहार्ट फॅन्सला हा सिनेमा नेहमीप्रमाणे आवडला. पण काही युजर्सनी मात्र ‘दबंग 3’वर नाराजी व्यक्त केली होती. ‘मला फ्रीमध्ये तिकिट मिळाले होते. पण चित्रपट पाहिल्यानंतर मी फ्रीमध्येही का तिकिट घेतले, असे मला वाटले. सलमान भाई आखीर कब तक़.. चांगले चित्रपट बनव, नाहीतर संन्यास घे,’ अशा अनेक कमेंट यानंतर पाहायला मिळाल्या होत्या.

टॅग्स :दबंग 3सलमान खान