Join us  

आमिरनं भावाचं आयुष्य उद्धवस्त केलं..., फैजल खानचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 6:26 PM

बालकलाकार म्हणून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता फैजल खान (Faissal Khan) सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे त्याचा ‘फॅक्टरी’ (Faactory) हा येऊ घातलेला सिनेमा.

ठळक मुद्दे सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर फैजल खान याने करण जोहरबद्दल एक खळबळजनक खुलासा केला होता.

बालकलाकार म्हणून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता फैजल खान (Faissal Khan) सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे त्याचा ‘फॅक्टरी  ’ (Faactory) हा येऊ घातलेला सिनेमा. या सिनेमातून फैजल दीर्घकाळानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतोय. इतकंच नाही तर सिनेमात तो मुख्य भूमिकेत आहे. शिवाय त्यानेच हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.आता हा फैजल खान कोण, हे आम्ही सांगण्याची गरज नाही. होय, बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) याचा भाऊ. ‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. यानंतर विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘मदहोश’नंतर फैजलने पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि यानंतर 2000 मध्ये ‘मेला’ या चित्रपटातून वापसी करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात फैजल भाऊ आमिरसोबत दिसला होता. हा चित्रपट फ्लॉप झाला. पण या चित्रपटाने फैजलला खरी ओळख दिली. अर्थात  ही ओळख फैजलला फार काळ टिकवता आली नाही.

तुम्हाला आठवत असेलच, आमिरच्या याच भावावर ‘मेंटल’ असल्याचा टॅग लावला गेला होता. तूर्तास फैजलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात तो वडापाववर ताव मारताना दिसतोय. विशेष म्हणजे, या व्हिडीओनंतर आमिर खान चांगलाच ट्रोल होतोय. आमिरने भावाचं आयुष्य उद्धवस्त केलं, अशा आशयाच्या कमेंट्स  नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

2007 मध्ये फैजल घरातून पळून गेल्याची खबर होती. काही दिवसानंतर तो सिजोफ्रीनिया नामक आजाराने पीडित असल्याची बातमी आली होती. केवळ इतकेच नाही तर आमिरने मला घरात कैद करून ठेवले आहे, असा आरोप करून फैजलने याकाळात खळबळ निर्माण केली होती. आमिर माझी संपत्ती हडपू इच्छितो, असेही त्याने म्हटले होते.  

 सुशांत सिंग राजपूत प्रकरणानंतर फैजल खान याने करण जोहरबद्दल एक खळबळजनक खुलासा केला होता. आमिरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत करण जोहरने सर्वांसमोर आपला अपमान केल्याचा आरोप करत फैजलने एक किस्सा शेअर केला होता. तुमचे काम फ्लॉप असेल तर करण जोहर तुम्हाला जराही भाव देत नाही. तो तुमच्याकडे बघत सुद्धा नाही. माझ्यासोबत हे सगळे घडले आहे, असे फैजलने सांगितले होते.  

टॅग्स :फैजल खानआमिर खान