Join us  

Fact Check: काय तैमूर अली खानने केला भाजपाचा प्रचार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 4:02 PM

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान व करिना कपूरचा मुलगा तैमूर अली खान सोशल मीडिया सेन्सेशन बनला आहे. पण सध्या कारण वेगळे आहे. होय, सध्या तैमूर त्याच्या टी-शर्टमुळे चर्चेत आहे.

ठळक मुद्देआज दिल्लीत १२ मे रोजी होत असलेल्या मतदानादरम्यान हा फोटो शेअर होत आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान व करिना कपूरचा मुलगा तैमूर अली खान सोशल मीडिया सेन्सेशन बनला आहे. पण सध्या कारण वेगळे आहे. होय, सध्या तैमूर त्याच्या टी-शर्टमुळे चर्चेत आहे.तसेही तैमूर बाहेर पडला रे पडला की, मीडियाचे कॅमेरे त्याची एक छबी टिपण्यासाठी सरसावतात. तैमूरचे रोज नवे फोटो व्हायरल होतात. पण यावेळी तैमूर नाही तर त्याचा टी-शर्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय. अलीकडे करिनाने मतदानाचा हक्क बजावला त्यावेळी तैमूरही तिच्यासोबत होता. यावेळी तैमूरने रोज आॅरेंज कलरचा टी-शर्ट घातला होता. याच टी-शर्टवरचा तैमूरचा फोटो चर्चेचा विषय बनला आहे. होय, तैमूरच्या या टी-शर्टवर ‘नमो अगेन’ लिहिलेले दिसतेय.  हा फोटो व्हायरल झाला आणि काय तैमूरने पीएम मोदी वा भाजपाचा प्रचार केला? असा प्रश्न अनेकांना पडला. पण या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘नाही’.

तैमूरचे मतदानाच्या दिवशीचे इतर अनेक फोटो शोधल्यावर या प्रश्नाचे ‘नाही’ असे उत्तर मिळले. प्रत्यक्षात ओरिजनल फोटोमध्ये तैमूरच्या टी-शर्टवर वेगळेच ग्राफिक्स आहे. याचा अर्थ ‘नमो अगेन’ लिहिलेल्या टी-शर्टचा त्याचा फोटो फोटोशॉप्ड आहे.

 

कुण्यातरी भाजपा समर्थकाने मोदींच्या समर्थनार्थ वातावरण बनवण्यासाठी तैमूरच्या या फोटोचा खूबीने वापर केला आणि त्याच्या टी-शर्टवर ‘नमो अगेन’ लिहून फोटो व्हायरल केला.आज दिल्लीत १२ मे रोजी होत असलेल्या मतदानादरम्यान हा फोटो शेअर होत आहे.

टॅग्स :तैमुरकरिना कपूरलोकसभा निवडणूक २०१९भाजपाफेक न्यूज