Join us

Fact Check : ‘पुष्पा’ फेम रश्मिका मंदानाचा ‘Oops Moment’ व्हिडीओ पाहून नाक मुरडण्याआधी, जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 15:58 IST

Rashmika Mandanna Video : रश्मिका ऊप्स मोमेंटची शिकार झाल्याचा दावा हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यांनी केला आहे. यावरून अनेकजण तिला ट्रोलही करत आहेत.

पुष्पा’ फेम रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आता केवळ साऊथ स्टार राहिलेली नाही तर बॉलिवूड स्टार झालीये. एकापाठोपाठ एक असे रश्मिकाचे दोन बॉलिवूड सिनेमे येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. तूर्तास चर्चा आहे ती रश्मिकाच्या एका व्हिडीओची. रश्मिका ऊप्स मोमेंटची शिकार झाल्याचा दावा हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यांनी केला आहे. यावरून अनेकजण तिला ट्रोलही करत आहेत. पण लगेच निष्कर्षाला पोहोचण्याआधी रश्मिकाच्या या व्हिडीओमागचं सत्य जाणून घ्यायला  हवं.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेला रश्मिकाचा हा व्हिडीओ एअरपोर्टवरचा आहे. यात रश्मिका स्टनिंग लुकमध्ये दिसतेय. डोळ्यावर काळा गॉगल, चेहऱ्यावर काळा मास्क आणि कॅज्युअल ड्रेस असा तिचा लुक आहे. रश्मिकाने घातलेल्या टॉपची डिझाईन थोडी वेगळी आहे. त्यामुळे त्यातून रश्मिकाचे इनर क्लोथ दिसत आहेत. रश्मिकाचा हा व्हिडीओ समोर येताच, चर्चेत आला. काही युजर्सनी यावरून नको तो निष्कर्ष काढला. पण व्हिडीओ बघता, यात रश्मिका कुठेही ऊप्स मोमेंटची शिकार झालेली नाही. काही युजर्सने विनाकारण स्लो मोशन व्हिडीओ व्हायरल करून यावरून रश्मिकाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी रश्मिकाला नको त्या शब्दांत सुनावलं. अर्थात काही युजर्सनी रश्मिकाचा बचाव करत, यात  काहीही विचित्र नाही. तिच्या ड्रेसचं डिझाईन नॉर्मल आहे, असं म्हटलं.

पुष्पा’च्या यशानंतर रश्मिकाकडे चित्रपटांची रांग लागली आहे. हिंदीत तिचा डेब्यू होतोय. मिशन मजनू आणि गुडबाय या दोन बॉलिवूड चित्रपटांत ती झळकणार आहे. यापैकी गुडबाय या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे तर मिशन मजनू या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. यााशिवाय सीता रामम, एसके 21 या चित्रपटातही तिची वर्णी लागली आहे.

टॅग्स :रश्मिका मंदानापुष्पा