Join us

Exclusive! ​अध्ययन सुमन दिग्दर्शकाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 12:12 IST

बॉलिवूड कलाकारांच्या मुलाने इंडस्ट्रीत येणे काही नवीन नाही. अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन, राकेश रोशन यांचा मुलगा हृतिक ...

बॉलिवूड कलाकारांच्या मुलाने इंडस्ट्रीत येणे काही नवीन नाही. अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन, राकेश रोशन यांचा मुलगा हृतिक रोशन यांसारखे अनेक स्टार किड बॉलिवूड मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या स्टार किडमध्ये शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनदेखील आहे. अध्ययनने 2008 मध्ये त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली.शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनने हाल ए दिल या चित्रपटाद्वारे बॉलिवूड इंडस्ट्रीत एंट्री केली. या त्याच्या पहिल्याच चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे सगळ्यांनी चांगलेच कौतुक केले. या चित्रपटासाठी त्याला नवोदित अभिनेत्यासाठी नामांकन देखील मिळाले होते. त्यानंतर तो राज - द मिस्ट्री कन्टिन्यूज, जश्न, हिम्मतवाला यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला. या चित्रपटांना प्रेक्षकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याने हार्टलेस या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याचे वडील शेखर सुमन यांनी केले होते. या चित्रपटाकडून त्याला खूप साऱ्या अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट झाला नाही.अध्ययन चित्रपटसृष्टीत येऊन पाच-सहा वर्षं झाले असले तरी अद्याप अभिनयक्षेत्रात तो आपला जम बसवू शकला नाही. अभिनयक्षेत्रानंतर आता त्याने दिग्दर्शनाकडे वळण्याचे ठरवले आहे. अध्ययन लवकरच एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून या चित्रपटावर सध्या तो काम करत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो प्रमुख भूमिका साकारतानादेखील प्रेक्षकांना दिसणार आहे. अध्ययनचा लखनवी इश्क हा चित्रपट 2015मध्ये प्रदर्शित झाला होता. पण त्यानंतर अध्ययन कोणत्याही चित्रपटात झळकला नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी कंगना राणौत आणि हृतिक रोशनच्या झालेल्या वादात अध्ययन सुमन हे नाव चर्चेत आले होते.