Exclusive ! राजकुमार हिरानीच्या आधी संजूसाठी 'या' व्यक्तिने रणबीरची केली होती निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 11:22 IST
सध्या सगळीकडे रणबीर कपूरचा आगामी चित्रपट 'संजू'ची चर्चा आहे. संजय दत्तचा हा बायोपिक रणबीरच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे ...
Exclusive ! राजकुमार हिरानीच्या आधी संजूसाठी 'या' व्यक्तिने रणबीरची केली होती निवड
सध्या सगळीकडे रणबीर कपूरचा आगामी चित्रपट 'संजू'ची चर्चा आहे. संजय दत्तचा हा बायोपिक रणबीरच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. संजय दत्तची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरने प्रचंड मेहनत घेतली आहे याचा अंदाज आपल्याला चित्रपटाच्या ट्रेलर बघून आलाच आहे. संजूच्या आयुष्यातील अनेक पैलूचा उलगडा यात होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची अनेक कारणांवरुन चर्चा आहे. रणबीरने यात साकारलेल्या संजय दत्तच्या भूमिकेचे कौतूक सर्वत्र होते आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की राजकुमार हिरानीच्या आधी संजय दत्तची पत्नी मान्यता देत हिने रणबीरची निवड संजय दत्तच्या भूमिकेसाठी केली होती. याचा खुसाला खुद्द रणबीर कपूरने केला आहे. रणबीर इंटरव्हु दरम्यान सांगितले की, रणबीर कपूर हा संजय दत्तच्याचा जीममध्ये जायचा त्यावेळी मान्यता दत्त त्याला नेहमी म्हणायची ज्यावेळी संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार होईल त्यावेळी त्याची भूमिका तूच साकारायचीस. यावर रणबीर फक्त हसायचा. त्यावेळी रणबीर त्याच्या बर्फी चित्रपटाचे शूटिंग करत होता. ALSO READ : ‘संजू’मधील न्यूड सीनबद्दल रणबीर कपूरने केला खुलासाराजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केलेला ‘संजू’ हा चित्रपट अभिनेता संजय दत्त याच्या जीवनातील चढ-उतारांवर आधारित आहे. हा चित्रपट एका प्रसिद्ध परिवारातून असलेल्या अभिनेत्याच्या जीवनाची कथा आहे. संजय दत्तच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आल्याने तो नेहमीच वादाच्या भोवºयात सापडलेला आहे. आता तो त्याच्या आयुष्यात स्थिरावला असला तरी, त्याचा भुतकाळ आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. हीच बाब या चित्रपटातून दाखविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नातेवाइकांचा अबोला, दहशतवादी असल्याची चर्चा हे सर्व काही या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. यात रणबीरसह मनीषा कोईराला, परेश रावल, अनुष्का शर्मा, दीया मिर्झा आणि सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. येत्या २९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना गेल्या अनेक दिवसांपासून लागली.