Join us

सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 11:25 IST

Aishwarya Rai And Salman Khan : बॉलिवूडमध्ये सर्वात गाजलेलं अफेयर जे होतं ते अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खानचं. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवर सुरू झालेलं त्यांचं अफेअर. जवळपास वर्षभर ते दोघे एकत्र होते. पण २००२ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. यामुळे ऐश्वर्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यावर मोठा परिणाम झाला होता.

बॉलिवूडमध्ये सर्वात गाजलेलं अफेयर जे होतं ते अभिनेत्री ऐश्वर्या राय  (Aishwarya Rai) आणि अभिनेता सलमान खान(Salman Khan)चं. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवर सुरू झालेलं त्यांचं अफेअर. जवळपास वर्षभर ते दोघे एकत्र होते. पण २००२ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. यामुळे ऐश्वर्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यावर मोठा परिणाम झाला होता. अलीकडेच, चित्रपट दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर (Prahlad Kakkar) यांनी एका मुलाखतीत ऐश्वर्या रायच्या त्या कठीण काळाबद्दल सांगितलं. प्रल्हाद कक्कर म्हणाले की, ऐश्वर्याला बॉलिवूडने मध्येच सोडून दिलं, त्यामुळे तिला खूप वाईट वाटलं होतं आणि फसवल्याचा अनुभव आला होता.

प्रल्हाद कक्कर यांनी पत्रकार विकी लालवानी यांच्या यूट्यूब चॅनेलवर सलमान खान आणि ऐश्वर्याच्या ब्रेकअपबद्दल बोलताना सांगितलं की, त्या नात्यामुळे ऐश्वर्याच्या करिअरवर खूप वाईट परिणाम झाला होता. त्यांनी सांगितलं, 'मी तिला फक्त सपोर्ट करत होतो. मी तिला सांगितलं होतं की काळजी करू नकोस. पण तिचं म्हणणं होतं की, इंडस्ट्रीचं काय? इंडस्ट्रीने सलमानसाठी मला मध्येच सोडून दिलं, या गोष्टीमुळे ऐश्वर्याला सर्वात जास्त वाईट वाटलं. तिला विश्वासघात झाल्यासारखं वाटलं.'

ऐश्वर्याला ब्रेकअपमुळे नाही, तर या कारणामुळे झालं दुःखप्रल्हाद कक्कर पुढे म्हणाले की, ऐश्वर्याला ब्रेकअपचं फारसं वाईट वाटलं नाही, जितकं इंडस्ट्रीने तिला दुर्लक्षित केल्यामुळे वाटलं. त्यांच्या मते, ''ती ब्रेकअपमुळे दु:खी नव्हती, तर तिला या गोष्टीचं दु:ख होतं की सगळे सलमानची बाजू घेत होते. तिच्या बाजूने कोणीच नव्हतं, जरी सत्य तिच्या बाजूने होतं तरी. इंडस्ट्री तटस्थ नसल्यामुळे तिचा त्यांच्यावरचा विश्वास उडून गेला होता.''

सलमान खान स्वतःचं डोकं भितींवर आपटायचाते पुढे म्हणाले की हे सगळं एकतर्फी होतं. त्यांनी सांगितलं की सलमान अनेकदा ऐश्वर्याच्या बिल्डिंगमध्ये येऊन गोंधळ घालायचा आणि आपलं डोकं भिंतीवर आपटायचा. ते म्हणाले की, ते स्वतः त्याच बिल्डिंगमध्ये राहायचे आणि दररोज हा तमाशा व्हायचा. प्रल्हाद कक्कर यांनी सांगितलं की, दोघांचं नातं खूप आधीच संपलं होतं, पण त्याची अधिकृत पुष्टी खूप उशिरा झाली. त्यानंतर ऐश्वर्याच्या कुटुंबासह सर्वांनाच दिलासा मिळाला.

टॅग्स :सलमान खानऐश्वर्या राय बच्चन