Join us  

मी तुझ्यावर प्रेम करते...! अखेर ईशा गुप्ताने दिली प्रेमाची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 11:42 AM

‘या’ बिझनेसमॅनला करतेय डेट

ठळक मुद्दे२०१२ मध्ये ‘जन्नत2’ द्वारे ईशाने बॉलिवूड डेब्यू केला होता.

बॉलिवूडची बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल अभिनेत्री ईशा गुप्ताला बॉलिवूडची सेनसेशनल अ‍ॅक्ट्रेस म्हटले जाते. सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असलेली ईशा कायम तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. पण तूर्तास ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. होय, बिनधास्त स्वभावाच्या ईशाने आता आपल्या रिलेशनशिपची कबुली दिली आहे. होय, Manuel Campos Gualla सोबतचा फोटो शेअर करत तिने आपले नाते   जगजाहिर केले आहे.

या फोटोसोबत तिने स्पॅनिशमध्ये काहीतरी लिहिलेय. याचा अर्थ ‘मी तुझ्यावर प्रेम करते’, असा होतो. फोटोत ईशा व मॅन्युअल दोघेही मॅचिंग कपड्यांमध्ये दिसत आहेत.

खरे तर ईशा गुप्ताच्या रिलेशनशिपची चर्चा याआधीही अनेकदा झाली. क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबतही तिचे नाव जोडले गेले. पण ईशाने प्रत्येकवेळी रिलेशनशिपच्या चर्चा धुडकावून लावल्यात आणि आता मॅन्युअलसोबतचे नाते तिने स्वत:च जगजाहिर केले. मॅन्युअल हा एक बिझनेसमॅन आहे. तो स्पेनमध्ये राहतो़ काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत ईशा बॉयफ्रेन्डबद्दल बोलली होती. 

‘माझा बॉयफ्रेन्ड सध्या स्पेनमध्ये आहे. कोरोनाचा धोका बघता तो आयसोलेशनमध्ये आहे. त्याने कोरोना व्हायरसबद्दल आधीच मला अलर्ट केले होते. त्यामुळे लॉकडाऊनसाठी मी आधीच मानसिकदृष्ट्या तयार होते. मी रोज त्याच्याशी बोलतेय. त्याच्या तब्येतीची विचारपूस करते. तो मला शांत राहायला सांगतो. कारण अनेकदा मी अधिक चिंता करायला लागते. सध्या मी शांत आहे. स्वत:ची काळजी घेतेय,’ असे तिने सांगितले होते. अर्थात या मुलाखतीत हा बॉयफ्रेन्ड कोण, त्याचे नाव काय, याचा खुलासा तिने केला नव्हता. पण आता तो मॅन्युअल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 २०१२ मध्ये ‘जन्नत2’ द्वारे ईशाने बॉलिवूड डेब्यू केला होता. या पहिल्याच चित्रपटासाठी ईशाला फिल्मफेअर पुरस्कारात बेस्ट फिमेल डेब्यूचे नॉमिनेशन मिळाले होते.

टॅग्स :ईशा गुप्ता