Join us  

बॉलिवूडमध्ये 'हा' स्टार किड करणार लवकरच एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 1:15 PM

सुनील शेट्टीचा मुलगा अहान तेलगू सिनेमा RX 100च्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

ठळक मुद्दे RX 100 तेलगू सिनेमाचा हिंदी रिमेक लवकरच अभिनेता अहान शेट्टीसोबत दिसणार अभिनेत्री सारा अली खान

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी हिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करीत आपली ओळख निर्माण केली. त्यानंतर आता सुनील शेट्टीचा मुलगा अहान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो तेलगू सिनेमा RX 100च्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहे आणि दिग्दर्शन मोहित सूरी करणार आहे.

सुनील शेट्टीचा मुलगा अहानला बॉलिवूडचा दबंग खान सलमान लाँच करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता साजिद नाडियादवालाच्या घोषणेनंतर ही गोष्ट स्पष्ट  झाली आहे की तो RX 100 या तेलगू सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. हा तेलगूमधील सुपरहिट चित्रपट आहे. RX 100 सिनेमात रोमँटिक लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. यात मुलगा व मुलगी आपल्या प्रेमाबद्दल घरी सांगतात, त्यानंतर कथेत नवा ट्विस्ट येतो. यावर आधारीत हा सिनेमा आहे. याबाबत साजिद नाडियादवालाने एका नावाजलेल्या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, मी RX 100च्या रिमेकचे राइट्स घेतले आहेत आणि यातून अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट मे 2019मध्ये प्रदर्शित होणार आहे. आम्ही या सिनेमाचे राइट्स घेतले कारण तरूणांच्या मनामध्ये या सिनेमाने घर केले आहे. मी अशा अनेक तरूणांना जाणतो ज्यांनी हा चित्रपट दहा वेळ थिएटरमध्ये जाऊन पाहिला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, RX 100च्या हिंदी रिमेकमध्ये अहान शेट्टीसोबत अभिनेत्री सारा अली खान दिसणार आहे. साजिद नाडियादवालाने टाइगर श्रॉफला हिरोपंती सिनेमातून बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. साजिदचे म्हणणे आहे की टाइगरची शरिरयष्टी अॅक्शन सिनेमासाठी अगदी योग्य आहे आणि रोमँटिक सिनेमासाठी अहान अगदी योग्य आहे. आता अहान शेट्टी RX 100 सिनेमातून काय कमाल दाखवतो हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

टॅग्स :अहान शेट्टीसुनील शेट्टी