Join us  

संपता संपेना रणबीर कपूर आणि सोनम कपूरमधील भांडणं?, अभिनेत्रीनं उडवली 'ब्रह्मास्त्र'ची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 6:41 PM

Koffee With Karan : 'कॉफी विथ करण'मध्ये सोनम कपूर(Sonam Kapoor)ने रणबीर कपूर(Ranbir Kapoor)ची खिल्ली उडवली होती.

कॉफी विथ करण (Koffee With Karan) या लोकप्रिय चॅट शोचा सातवा सीझन धमाकेदार होणार आहे. आगामी एपिसोडमध्ये खूप मनोरंजन होणार आहे. कारण सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे भावंड चॅट शोमध्ये सहभागी होणार आहेत. शोचा प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये सोनमने अभिनेता रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाची खिल्ली उडवली आहे.

'कॉफी विथ करण'मध्ये सोनम कपूरनेरणबीर कपूरची खिल्ली उडवली होती. त्याच्या बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे नावही चुकीचे बोलले गेले. सोप्या भाषेत सांगायचे तर सोनमने ब्रह्मास्त्र या शीर्षकाची खिल्ली उडवली. करण जोहरच्या शोमध्ये सोनमचे रणबीरसोबतचे जुने भांडणं स्पष्टपणे दिसून येत होते.असे वाटत होते की आतापर्यंत सोनम कपूर रणबीरसोबतचे तिचे मतभेद विसरू शकली नाही. 

करण जोहरने सोनम कपूरला विचारले की, तिच्या मते मॅन ऑफ द मोमेंट कोण आहे? उत्तरात सोनम म्हणाली, रणबीर कपूर सर्वोत्कृष्ट आहे कारण मी त्याला आजकाल सर्वत्र अयान मुखर्जीच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना पाहत आहे. त्यानंतर जेव्हा करण जोहरने चित्रपटाचे नाव विचारले तेव्हा सोनम कपूरने एक मजेदार नाव घेतले. हे ऐकल्यानंतर करण जोहरला हसू आवरले नाही आणि अर्जुन कपूरने डोक्यावर हात मारला. सोनम म्हणाली- शिवा नंबर १. सोनम कपूरला ३०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या रणबीरच्या चित्रपटाचे नाव माहित नाही, हे लोकांना पचनी पडत नाही.

सोनमने यापूर्वी कॉफी विथ करणमध्ये येऊन रणबीर कपूरवर निशाणा साधला होता. त्यावेळी सोनम रणबीरच्या प्रत्येक गोष्टीवर अ‍ॅटॅकिंग मोडमध्ये गेली होती. त्यानंतर दीपिका पादुकोणही सोनमसोबत कॉफी सोफ्यावर दिसली. त्यावेळी दीपिका आणि रणबीरचे ब्रेकअप झाले होते. सोनमने शोमध्ये दीपिकाची बाजू घेतली आणि रणबीर चांगला बॉयफ्रेंड असल्याबद्दल शंका व्यक्त केली. एका मुलाखतीत सोनमने रणबीरला मामाचा मुलगा म्हटले होते. असेही म्हणाली होती की रणबीर सेक्सी नाही, तर मुली त्याच्या मागे का पागल होतात? या सगळ्या वादविवादात सोनम आणि रणबीरने संजू चित्रपटात एकत्र काम केले होते. आता वर्षांनंतर सोनमने ज्या प्रकारे रणबीर कपूरवर पुन्हा निशाणा साधला आहे, त्यावरून सोनम काहीच विसरली नसल्याचे दिसते. 

टॅग्स :सोनम कपूरकॉफी विथ करण 6करण जोहररणबीर कपूरअर्जुन कपूर