Join us  

रूमी जाफरीच्या चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन-इमरान हाश्मीची जोडी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 12:00 PM

‘तेरा यार हूं मैं’नंतर अमिताभ यांनी दिग्दर्शक रूमी जाफरी यांचा सिनेमा साईन केला आहे. काही क्षणांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाली.

ठळक मुद्देअमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीशिवाय अन्नू कपूर आणि सौरभ शुक्ला सारखे दिग्गज कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचे कळतेय.

महानायक अमिताभ बच्चन यांचा  ‘बदला’ हा सिनेमा अद्यापही बॉक्सआॅफिसवर धूम करतोय. सध्या बिग बी अमिताभ बच्चन   ‘तेरा यार हूं मैं’ या चित्रपटात बिझी आहेत. हिंदी, तामिळ आणि बंगाली भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  ‘तेरा यार हूं मैं’नंतर अमिताभ यांनी दिग्दर्शक रूमी जाफरी यांचा सिनेमा साईन केला आहे. काही क्षणांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाली. विशेष म्हणजे, या चित्रपटात इमरान हाश्मी अमिताभ यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

खुद्द इमरानने या वृत्ताला दुजोरा दिला. ‘आनंद पंडित निर्मिती असलेल्या नव्या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. रूमी जाफरी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. पुढील वर्षी २१ फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होईल,’ असे ट्वीट इमरानने केले.

अमिताभ यांनीही या आगामी चित्रपटाबद्दलची उत्सुकता बोलून दाखवली. ‘अनेक वर्षांपूर्वीची कमिटमेंट आत्ता कुठे पूर्ण होतेय. अखेर आनंद पंडित यांच्या नव्या चित्रपटात काम करणार. या चित्रपटात इमरान हाश्मीही दिसेल,’असे अमिताभ यांनी ट्वीटरवर लिहिले.अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मीशिवाय अन्नू कपूर आणि सौरभ शुक्ला सारखे दिग्गज कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचे कळतेय. या चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. पुढील महिन्यात या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल.अलीकडे इमरान हाश्मीचा ‘व्हाय चीट इंडिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणा-या या चित्रपटातील इमरानच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

टॅग्स :अमिताभ बच्चनइमरान हाश्मी