Join us

​ विद्युत जामवाल बनला ‘जंगली’! पाहा, खास वर्कआऊट स्टंट्स!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 11:33 IST

अभिनेता विद्युत जामवाल त्यांची शानदार बॉडी आणि अ‍ॅक्शनसाठी बॉलिवूडमध्ये ओळखला जातो. विद्युतची अ‍ॅक्शनदृश्ये पाहताना सर्वांचेच श्वास रोखले जातात. सध्या विद्युत ‘जंगली’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे

अभिनेता विद्युत जामवाल त्यांची शानदार बॉडी आणि अ‍ॅक्शनसाठी बॉलिवूडमध्ये ओळखला जातो. विद्युतची अ‍ॅक्शनदृश्ये पाहताना सर्वांचेच श्वास रोखले जातात. सध्या विद्युत ‘जंगली’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातही विद्युतची एकापेक्षा एक जबरदस्त अ‍ॅक्शन दृश्ये दिसणार आहेत. विशेष म्हणजे, यासाठी विद्युत खास ट्रेनिंगही घेतले. थायलंडमध्ये त्याने या चित्रपटाची तयारी केली. या ट्रेनिंगचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. या व्हिडिओत विद्युत चार बाटल्यांवर एक्सरसाईज करताना दिसतोय. या  काचेच्या रिकाम्याबाटल्यांवर स्वत:चे वजन टाकून पुुशअप्स करताना विद्युत यात दिसतोय. फिटनेस आणि बॅलन्स राखण्यात विद्युत किती तरबेज झालाय, हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल.‘जंगली’ हा चित्रपट एक अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. मानव आणि हत्ती यांची अनोखी कथा यात पाहायला मिळणार आहे. विद्युतने या चित्रपटात पशुचिकित्सकाची भूमिका साकारली आहे.जंगलातील शिका-यांपासून प्राण्यांचे रक्षण करताना तो यात दिसणार आहे. हॉलिवूड चित्रपट निर्माता ्नचक रसेल हे हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. ‘द मास्क’,‘अ नाईटमेर आॅन एल्स ट्रिट’,‘द स्कॉर्पियन किंग’ आणि ‘आय एम व्रथ’ सारख्या सिनेमात रसेल यांनी योगदान दिले आहे. विद्युतचा हा चित्रपट १९ आक्टोबर २०१८ रोजी प्रदर्शित होतो आहे.अलीकडे विद्युत ‘बादशाहो’मध्ये दिसला होता. यात त्याने पोलिस अधिका-याची भूमिका साकारली होती. ‘कमांडो2’मध्ये विद्युत लीड रोलमध्ये दिसला होता. मात्र बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार चांगले प्रदर्शन करू शकला नाही. आता विद्युतचा ‘जंगली’ बॉक्सआॅफिसवर कशी कमाल करतो, ते बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.ALSO READ : काय?? विद्युत जामवालला व्हायचेयं Nude?