Join us  

एकता कपूर पुन्हा आई होणार? अविवाहित असूनही आहे ५ वर्षांचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 11:42 AM

एकता कपूर दुसऱ्यांंदा आई होणार आहे. त्यामुळे चर्चांना एकच उधाण आलंय (ekta kapoor)

बॉलिवूडमधली सुप्रसिद्ध निर्माती आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील राणी म्हणून जिला ओळखलं जातं ती म्हणजे एकता कपूर.एकता कपूरने आजवर टेलिव्हिजन विश्वाला अनेक लोकप्रिय मालिका दिल्या आहेत. एकता कपूर वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. एकताच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी. एकता अविवाहीत असूनही दुसऱ्यांदा आई होणार आहे. त्यामुळे एकतावर सर्वजण अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

अलीकडेच बॉलीवूड लाइफच्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, एकता कपूर सरोगसीद्वारे दुसऱ्यांदा आई बनणार आहे. एंटरटेनमेंट पोर्टलने दावा केला आहे की, लोकप्रिय निर्माती एकता कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे. एकता कपूरला याआधी रवी हा ५ वर्षांचा मुलगा आहे. रवीला भावंडं व्हावं या उद्देशाने एकताने पुन्हा एकदा आई होण्याचा निर्णय घेतला. एकताचे आई-वडील जितेंद्र आणि शोभा कपूर यांनीही तिच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय.

एकता कपूरच्या जवळच्या व्यक्तीने मात्र हे वृत्त फेटाळून लावले आहे. हे सर्व खोटं आहे,  ई-टाइम्सशी बोलताना या व्यक्तीने असा युक्तिवाद केला की, अशा बातम्या प्रसिद्ध करण्यापूर्वी सत्य पडताळून घेणं आवश्यक आहे. फक्त एका क्लिक्ससाठी खोटी माहिती पसरवणे चुकीचं आहे. पत्रकारांनी बातमी प्रकाशित करण्यापूर्वी तथ्यं पडताळून पाहिली पाहिजेत," आता एकता कपूर खरंच दुसऱ्यांदा आई होणार का, हे तिच जाणे.

टॅग्स :एकता कपूरबॉलिवूड