Join us  

फोटोतल्या 'या' चिमुकल्यांना ओळखून दाखवा!; एक आहे प्रसिद्ध निर्माती तर दुसरा आहे सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 6:25 PM

Bollywood star: कलाविश्वात कायम या दोन्ही सेलिब्रिटींची चर्चा रंगत असते.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कलाकार मंडळी कायम नवनवीन शक्कल लढवत असतात. यात खासकरुन सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सेलिब्रिटी थेट आपल्या आवडत्या कलाकाराशी जोडले जातात. त्यामुळे अनेक कलाकार त्यांच्या जीवनातील लहानमोठे किस्से, घडामोडी किंवा एखादी आठवण शेअर करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच दोन सेलिब्रिटींच्या बालपणीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही कलाकार भन्नाट डान्स करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ब्ल्यू कलरच्या शर्टमध्ये एक चिमुकला मुलगा दिसत असून त्याच्याच बाजूला पांढऱ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये एक मुलगी दिसून येत आहे. हे दोघंही उत्तमरित्या डान्स करत आहेत. त्यामुळे त्याच्याकडेच सगळ्यांच लक्ष वेधलं जात आहे. विशेष म्हणजे उत्तमरित्या डान्स करणारे हे चिमुकले आज बॉलिवूडमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसणारे हे चिमुकले म्हणजे अभिनेता हृतिक रोशन (hrithik roshan)आणि एकता कपूर (ekta kapoor) आहेत. आज हे दोघही त्यांच्या कलागुणांमुळे कलाविश्वात ओळखले जातात. विशेष म्हणजे त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यावर या दोघांमध्ये लहानपणापासून नृत्याचे गुण असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये हृतिक आणि एकता 'अपनी तो जैसे तैसे' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अलिकडेच हृतिकने त्याचा वाढदिवस साजरा केला. 

टॅग्स :बॉलिवूडएकता कपूरहृतिक रोशनसेलिब्रिटीसिनेमा