Join us

‘या’ भीतीमुळे सनी लिओनी पतीला प्रत्येक ठिकाणी सोबत मिरविते, वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 20:08 IST

बॉलिवूडची लैला सनी लिओनी हिला कोण ओळखत नसेल असा क्वचितच म्हणावा लागेल. आपल्या हॉट अंदाजामुळे सध्या सनी लिओनी इंडस्ट्रीमध्ये ...

बॉलिवूडची लैला सनी लिओनी हिला कोण ओळखत नसेल असा क्वचितच म्हणावा लागेल. आपल्या हॉट अंदाजामुळे सध्या सनी लिओनी इंडस्ट्रीमध्ये नवी सनसेशन बनली आहे. सनीने आतापर्यंत बादशाह शाहरूख खानसह मोेठमोठ्या स्टारसोबत आतापर्यंत काम केले आहे. त्यामुळे तिच्या लोकप्रियतेचा रेषो दिवसेंदिवस वाढतच आहे. असो, आज आम्ही तुम्हाला सनीचे एक सीक्रेट सांगणार आहोत. कदाचित तुम्ही ही बाब नोटीस केली असेल की, अवॉर्ड शो असो वा प्रमोशन इव्हेंट्समध्ये सनी पती डेनियल वेबरलासोबत घेऊन जात असते. मात्र तुम्हाला माहिती आहे काय की, सनी पतीला घेऊन का बरं प्रत्येक ठिकाणी जात असते? याचा खुलासा आज आम्ही करणार आहोत.  सगळ्यांनाच माहिती आहे की, सनी लिओनी पोर्न इंडस्ट्रीमध्ये स्टार राहिली आहे. सध्या ती बॉलिवूडमध्ये काम करीत आहे. मात्र सनीला बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला आहे. जेव्हा सनीने बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती तेव्हा बरेचसे बॉलिवूड स्टार्स तिला बघून पळून जायचे. तिच्यासोबत हाय-हॅलो करायलादेखील बॉलिवूड स्टार्स घाबरायचे. एका मुलाखतीदरम्यान सनी लिओनीने याबाबतचा खुलासा केला होता की, जेव्हा मी माझ्या पहिल्या चित्रपटाच्या एका अवॉर्ड शोमध्ये गेली होती, तेव्हा त्याठिकाणी बरेचसे स्टार्स माझ्याजवळ बसण्यास नकार देत होते. तसेच माझ्यासोबत फोटो काढायलाही नकार द्यायचे. पुढे सनीने सांगितले होते की, जेव्हा मला स्टेजवर बोलाविण्यात आले तेव्हा कोणीही माझ्यासोबत स्टेजवर उभे राहण्यास तयार नव्हते. कारण त्यांना असे वाटायचे की, मी सनी लिओनी असून, ज्या इंडस्ट्रीमधून आली आहे त्याठिकाणच्या लोकांना सन्मान दिला जात नाही. सुशिक्षित लोकांचा माझ्या प्रतीचा असलेला हा स्वभाव बघून मी चकीत झाली. त्याचबरोबर मला प्रचंड दु:खही झाले. अशा परिस्थितीत मी स्वत:ला एकटी समजून घाबरू लागली. त्यानंतर मी प्रत्येक ठिकाणी पती डेनियलला सोबत घेऊन जात असते. डेनियल केवळ माझ्यासोबत उभाच राहत नाही तर एका मित्राप्रमाणे मला पुढे जाण्यास प्रेरणा देतो, असेही सनीने सांगितले.