Join us

मुलगी त्रिशाला ‘ही’ गोष्ट लपवित असल्याने संजय दत्त धारण करतो ‘मुस्सा’चा अवतार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2017 16:43 IST

​अभिनेता संजय दत्त मुलगी त्रिशाला हिच्या खूपच क्लोज आहे. सध्या त्रिशाला न्यूयॉर्क येथे असून, संजूबाबा दररोज तिच्याशी फेसटाइमच्या माध्यमातून संपर्कात असतो.

अभिनेता संजय दत्त मुलगी त्रिशाला हिच्या खूपच क्लोज आहे. सध्या त्रिशाला न्यूयॉर्क येथे असून, संजूबाबा दररोज तिच्याशी फेसटाइमच्या माध्यमातून संपर्कात असतो. त्रिशालाने नुकताच वडील संजय दत्तसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये बाप-लेकीची जुगलबंदी बघावयास मिळत आहे. त्रिशाला व्हिडीओमध्ये म्हणतेय की, ‘ते प्रत्येकवेळी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात की, माझा बॉयफ्रेण्ड आहे की नाही? जेव्हा माझ्याकडून नाही असे उत्तर येते तेव्हा ते ‘प्लान’ चित्रपटातील मुस्साचा अवतार धारण करतात, अन् मला म्हणतात की, मला माहीत आहे की, तू माझ्याशी खोटं बोलत आहे.’त्रिशाला संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा हिची मुलगी आहे. ऋचाच्या मृत्यूनंतर त्रिशाला तिच्या आजी-अजोबासोबत न्यूयॉर्क येथे राहात आहे. मात्र संजूबाबा त्रिशालाच्या खूपच क्लोज आहे. तो नेहमी तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. त्रिशाला एकप्रकारे संजूबाबाचे बळ आहे. जेव्हा संजूबाबा जेलमध्ये होता, तेव्हा त्रिशाला त्याला नियमितपणे पत्र लिहीत होती. त्यावेळी संजूबाबाने तिला एक पत्र लिहिताना म्हटले होते की, ‘तू माझी ताकद आहेस’ संजूबाबाच नव्हे तर त्याची तिसरी पत्नी मान्यतादेखील त्रिशालाच्या खूप क्लोज आहे. काही दिवसांपूर्वीच मान्यता आणि त्रिशालाचे काही फोटोज् लीक झाले होते. फोटोमध्ये दोघीही मस्ती करताना बघावयास मिळत होत्या. दोघी एकमेकींसोबत खूपच आनंदी दिसत होत्या. काही दिवसांपूर्वीच मान्यता सुट्या एन्जॉय करण्यासाठी न्यूयॉर्कला गेली होती. मान्यता अन् त्रिशालामधील ट्यूनिंग संजूबाबाला खूपच आवडते. संजूबाबाच्या मते मान्यताने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. तिने ज्या पद्धतीने त्याचा परिवार सावरला ते इतर दुसºया कुठल्याही महिलेला शक्य झाले नसते. जेव्हा संजूबाबा जेलमध्ये गेला होता, तेव्हा त्याच्या दोन लहान मुलांचा मान्यताने अतिशय धाडसाने सांभाळ केला होता. त्याचबरोबर त्याच्या फिल्मी करिअरवरदेखील कुठल्याही प्रकारचे संकट येऊ दिले नव्हते. संजूबाबाच्या प्रत्येक अडचणीत मान्यताने त्याला साथ दिली आहे. त्यामुळे संजूबाबाच्या आयुष्यात मान्यताचे स्थान खूपच महत्त्वपूर्ण असल्याचे तो म्हणतो. सध्या संजूबाबा त्याच्या आगामी ‘भूमी’ या चित्रपटात व्यस्त आहे. यासाठी तो खूपच एक्साइटेड असल्याचे त्याने यापूर्वीच सांगितले आहे.