Join us

चुलत भावाच्या कॉकटेल पार्टीत नाचणाऱ्या रणवीर सिंगचा ‘हा’ अंदाज तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2018 12:27 IST

शाहिद कपूर, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचा ‘पद्मावत’ चित्रपटगृहात रिलीज झाला. सिनेमात अलाउद्दीन खिल्जी (रणवीस सिंग) पद्मावती (दीपिका ...

शाहिद कपूर, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांचा ‘पद्मावत’ चित्रपटगृहात रिलीज झाला. सिनेमात अलाउद्दीन खिल्जी (रणवीस सिंग) पद्मावती (दीपिका पादुकोण) आणि  राजा रावल रतन सिंग (शाहिद कपूर) यांनी साकारलेल्या भूमिका खूप चर्चेचा विषय ठरत आहे. सिनेमाच्या घोषणेपासूनच जस जसे सिनेमातल्या वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येत गेल्या तसे सगळेच कॅरेक्टर रसिकांच्या पसंतीस उतरले. मग शाहिदने साकारलेला राजा रतन सिंग असो किंवा मग रणवीरने साकारलेला अलाउद्दीन खिल्जी असो सगळेच कॅरेक्टर प्रदर्शनापूर्वीच रसिकांची पसंती मिळवण्यात यशस्वी ठरले. सध्या रणवीर आणि शाहिद कपूर दोघांचे खूप कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अलाउद्दीन खिलजीच्या पत्नीची भूमिका साकरणारी अभिनेत्री अदिती राव हैदरीही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे. मात्र, तुम्हाला माहितीये का, हाच अलाऊद्दीन खिल्जीची भूमिका साकारणारा रणवीर सिंग अलिकडेच त्याचा चुलत भावाने आयोजित केलेल्या कॉकटेल पार्टीत बेधुंदपणे नाचत होता. विश्वास बसत नाही ना, पण, होय हे खरंय कारण हा फोटो सोशल मीडियावर सध्या एकदम हिट झाला आहे. तो डान्स फ्लोअर खऱ्या अर्थाने एन्जॉय करताना दिसतो आहे. त्याने त्याचे हात हवेत धरून रॉकिंग अंदाजात डान्स करताना दिसतो आहे. तसंही त्याला कुठल्याही पार्टीत वा सोहळयात नाचायला मनापासून आवडतं. अशा पाटर्यांमध्ये तो स्वत:ला कुणी सेलिब्रिटी असल्याचे विसरून जातो. खरंतर हेच त्याच्याबद्दल एक माणूस म्हणून खूप मोठी गोष्ट वाटते.