Join us

​विराट कोहली व अनुष्का शर्माच्या न्यूयॉर्क व्हॅकेशनचे फोटो तुम्ही पाहिलेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2017 13:50 IST

अनुष्का व विराटचे न्यूयॉर्कमधील व्हॅकेशन संपले आहे. विराटने स्वत: सोशल मीडियावर तसे जाहिर केले आहे. पण ही ट्रिप संपली असली तरी या ट्रिपच्या आठवणी मात्र इतक्यात संपणा-या नाहीत. होय, अनुष्का व विराटच्या या रोमॅन्टिक हॉलीडेचे काही फोटो आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

विराट कोहली अन् त्याची लेडी लव्ह अनुष्का शर्मा सध्या काय करताहेत? तुम्ही म्हणाल, न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर सुट्टी एन्जॉय करताहेत. पण नाही, सुट्टी संपलीय. होय, अनुष्का व विराटचे न्यूयॉर्कमधील व्हॅकेशन संपले आहे. विराटने स्वत: सोशल मीडियावर तसे जाहिर केले आहे. ‘Back to the grind again’, असे त्याने म्हटले आहे. पण ही ट्रिप संपली असली तरी या ट्रिपच्या आठवणी मात्र इतक्यात संपणाºया नाहीत. होय, अनुष्का व विराटच्या या रोमॅन्टिक हॉलीडेचे काही फोटो आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यातील काही फोटोंमध्ये अनुष्का व विराट आपल्या चाहत्यासोबत दिसत आहेत. न्यूयॉर्कमध्ये अनुष्का व विराट भन्नाट फिरले. येथील मेट्रोपॉलिटन म्युझिअम आॅफ आर्टला त्यांनी भेट दिली. अर्थात या भेटीचे एकत्रित फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणे दोघांनीही टाळले. पण दोघांनीही ही ट्रिप मस्तपैकी एन्जॉय केली, हे मात्र खरे. दोघांनीही एकत्र फोटो काढले नाहीत किंवा ते पोस्ट केले नाहीत. पण जे फोटो पोस्ट केलेत, त्यात अनुष्का व विराट दोघेही कमालीचे आनंदी दिसताहेत.  हे ‘व्हिटॅमिन व्ही’ दोघांनीही पुढच्या रोमॅन्टिक डेटपर्यंत पुरेल, अशी आपण आशा करूयात. अनुष्का व विराट आयफा सोहळ्यादरम्यान न्यूयॉर्कला गेले होते. पण असे असूनही अनुष्काने आयफा अवार्डमध्ये हजेरी लावणे टाळले. खरे तर अनुष्का आयफाला नाही तर संजय दत्तच्या बायोपिकच्या शूटींगसाठी सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या रणबीरसोबतचे तिचे काही सीन याठिकाणी शूट होत आहेत. या बायोपिकमध्ये अनुष्का पत्रकाराच्या भूमिकेत आहे.