Join us

​गौरी खानने सजवलेले रणबीरचे नवे घर तुम्ही पाहिलेयं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 12:52 IST

Gauri Khan Shared Some Cool Photos Of Ranbir Kapoor’s New House : Gauri Khan : Ranbir Kapoor’s New House : गौरी खानने सजवलेल्या रणबीर कपूरच्या नव्या घराचे काही फोटो...

शाहरूख खानची पत्नी गौरी खान एक मोठी इंटीरियर डिझाइनर आहे. त्यामुळेच ऋषी कपूर यांनी आपल्या मुलाच्या अर्थात रणबीर कपूरच्या नव्या घराच्या इंटीरियरची जबाबदारी गौरीवर सोपवली होती. गौरीने ही जबाबदारी अगदी उत्कृष्ट पार पाडली. तिने रणबीरचे घर इतके सुंदर सजवले की, ऋषी कपूर आणि नीतू कपूर जाम खूश झाले. ऋषी कपूर यांनी तर लगेच गौरीचे कौतुकही केले. अद्भूत वास्तू, गौरी खान, तू रणबीरच्या फ्लॅटला घर बनवलेस. मी आणि नीतू तू सजवलेले घर पाहून अतिशय खूश झालोत. धन्यवाद, असे टष्ट्वीट ऋषी कपूर यांनी अलीकडे केले.काही दिवस आजीसोबत म्हणजेच कृष्णा राज कपूर यांच्यासोबत त्यांच्या घरी राहिल्यानंतर आज १४ डिसेंबरला रणबीर त्याच्या या नव्या घरात शिफ्ट झाला. आज  १४ डिसेंबर म्हणजेच रणबीरच्या आजोबांचा म्हणजेच  शो मॅन  राज कपूर यांचा ९२वा वाढदिवस आहे. नव्या घरातील गृहप्रवेशासाठी रणबीरने नेमक्या आजोबांच्या वाढदिवसाचे मुहूर्त साधले. या नव्या घराचे काही फोटो गौरीने इन्टाग्रामवर शेअर केले आहे. यातील एक फोटो अक्षरश: डोळे दिपवणारा आहे. गौरीने रणबीरचे घर किती सुंंदर सजवले असेल, याचा अंदाज हा फोटो पाहून तुम्हाला येऊ शकतो. या फोटोत गौरी आणि रणबीर हे दोघेही दिसत आहेत. तेव्हा तुम्ही बघा तर गौरी खानने सजवलेल्या रणबीरच्या नव्या घराचे काही फोटो... गौरीने हृतिक रोशन याची एक्स वाईफ सुजैन खानसोबत पार्टनरशिपमध्ये इंटीरियर डझाईन सुरु केले होते. यानंतर डिझाईनर सेल नावाने नव्या इंटीरियर स्टोरची सुरुवात केली होती.