‘क्वीन’ कंगना राणौतच्या घराचे इनसाईड फोटो तुम्ही बघितलेतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 11:12 IST
बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौत सध्या ‘मणिकर्णिक : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात बिझी आहे. हा चित्रपट माझा अभिनेत्री ...
‘क्वीन’ कंगना राणौतच्या घराचे इनसाईड फोटो तुम्ही बघितलेतं?
बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौत सध्या ‘मणिकर्णिक : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात बिझी आहे. हा चित्रपट माझा अभिनेत्री म्हणून कदाचित शेवटचा सिनेमा असेल. कारण यानंतर मी दिग्दर्शन करेल आणि अभिनय केला तरी माझ्याच चित्रपटात करेल, असे सांगून कंगनाने सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेतच. अशातच कंगनाच्या सुंदर घराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत आहे. कंगनाने अलीकडे एका मॅगझिनसाठी फोटोशूट केले. हे फोटोशूट कंगनाच्या मुंबईतील राहत्या घरी झाले. ज्यात तिने आपल्या घराचे इनसाईड फोटो शेअर केले आहेत. कंगनाने नुकताच तिच्या घराचा कायापालट केला आहे. ‘क्वीन’ चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहलची पत्नी रिचा बहलने तिच्या घराचे इंटिरिअर केले आहे. कंगनाच्या या घराचे वैशिष्ट्य म्हणजे, तिच्या घरातील प्रत्येक खोलीची स्वत:ची अशी एक ओळख असून ती कंगनाशी निगडीत आहे. कंगना जवळपास तीन वर्षांपासून खार येथील एका प्रशस्त फ्लॅटमध्ये राहात आहे. तिचे हे घर एखाद्या राजमहालापेक्षा कमी नाही, असेच तुम्ही म्हणून शकाल. कंगनाचा स्वभाव आणि तिच्या आवडीनिवडींनुसारच तिचे हे घर डिझाईन करण्यात आले आहे. रिचाने कंगनाच्या घराचे इंटिरिअर केले असले तरी त्यासाठीच्या सर्व संकल्पना कंगनाच्याच आहेत. लिव्हिंग रुमझ्र कंगनाचा लिव्हिंग रुम हा एखाद्या वस्तुसंग्रहालयाप्रमाणे दिसत आहे. या रुममध्ये कंगनाने संग्रही ठेवलेल्या अनेक गोष्टी आहेत. कंगनाच्या घराच्या भींतीवरचा हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मोन्रोचा फोटोही लक्षवेधी आहे. मर्लिनप्रमाणेच कंगनाही बिनधास्त आयुष्य जगण्याला प्राधान्य देते. ब्रिटीश आणि हिमाचल प्रदेशातील घरांची सुरेख सांगड तिच्या या घरात दिसते आहे. तेव्हा तुम्हीही कंगनाचे हे अलिशान घर बघा आणि ते कसे वाटले हे आम्हाला कळवा.