सिनेमा जगताच्या इतिहासात अनेक असे अभिनेते होऊन गेले, जे त्यांच्या काळात मोठे सुपरस्टार मानले जायचे. पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आजच्या काळात त्यांच्याबद्दल फारसे कोणाला माहिती नाही. असाच एक अभिनेता ९० च्या दशकातही होता, ज्याने गोविंदासोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. 'चॉकलेटी बॉय' या प्रतिमेमुळे या अभिनेत्याला खूप लोकप्रियता मिळाली होती. इतकंच नाही तर या अभिनेत्याचा बॉलिवूड डेब्यू देखील सुपरहिट ठरला होता, पण एका अपघाताने त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले आणि बिचाऱ्याला केवळ २६ वर्षांच्या वयात अभिनयातून निवृत्ती घ्यावी लागली. हा अभिनेता दुसरा कोणी नसून अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत 'प्रेम कैदी' चित्रपटात दिसलेला हरीश कुमार (Harish Kumar) आहे. होय, हरीश एकेकाळी बॉलिवूड इंडस्ट्रीत 'चॉकलेटी बॉय' म्हणून ओळखला जायचा. प्रेम कैदी, तिरंगा, कुली नंबर-१, आंटी नंबर-१, न्यायदाता आणि बुलंदी या सिनेमात त्याने काम केले.
त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवली, पण आज हा अभिनेता गुमनामीच्या छायेत आहे. हरीशने २०११ मध्ये हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनयातून संन्यास का घेतला, हे सांगितले. तो म्हणाला की, "कोणालाही आपल्या करिअरच्या शिखरावर असताना काम सोडायचे नसते, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. एका अपघातामुळे माझ्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली आणि मला स्लिप डिस्कचा त्रास सुरू झाला. मी अंथरुणावरून उठून बाथरुमपर्यंतही जाऊ शकत नव्हतो. L3 आणि L5 हाडांमध्ये खूप त्रास होता. डॉक्टरांनी मला पूर्णवेळ बेड रेस्टचा सल्ला दिला. यामुळे हळूहळू मी सगळ्यांपासून दूर होऊ लागलो."
हरीश कुमार शोबिजच्या जगातून अचानक गायब झाला असला तरी, आज तो लेखक आणि निर्माता म्हणून सक्रीय आहे. त्याने फक्त अभिनयातून ब्रेक घेतला आहे. पण यात शंका नाही की ९० च्या दशकात तो सलमान खान आणि शाहरुख खान सारख्या कलाकारांनाही टक्कर देत होता.
आता कुठे राहतो हरीश?लाईमलाईटपासून दूर राहिलेला हरीश कुमार आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहतो. हरीशने १९९५ मध्ये संगीता चुघ यांच्याशी लग्न केले आणि आजही तो आपल्या पत्नीसोबत आनंदी जीवन जगत आहे. हरीशला दोन मुलगे आहेत, त्यांची नावे सागर राव आणि शिवम आहेत.
Web Summary : Harish Kumar, a popular 90s actor, retired at 26 after a spinal injury. Known for 'Prem Qaidi,' he left acting but remains active as a writer and producer. He resides in Mumbai with his family.
Web Summary : 90 के दशक के लोकप्रिय अभिनेता हरीश कुमार 26 साल की उम्र में रीढ़ की हड्डी में चोट लगने के बाद सेवानिवृत्त हो गए। 'प्रेम कैदी' के लिए जाने जाने वाले, उन्होंने अभिनय छोड़ दिया लेकिन एक लेखक और निर्माता के रूप में सक्रिय हैं। वह मुंबई में अपने परिवार के साथ रहते हैं।