Join us  

ओळखलंत का या चिमुकल्यांना?, फोटोतील ही भाऊ बहिणींची जोडी आज बॉलिवूडवर गाजवतेय राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 8:00 AM

सोशल मीडियावर भाऊ-बहिणीचा एक फोटो व्हायरल होत असून, दोघेही बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार आहेत.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक भाऊ बहिणीच्या जोड्या आहेत जे या इंडस्ट्रीत काम करतेय. श्रद्धा कपूर (Shraddha kapoor) आणि तिचा भाऊ सिद्धांत कपूर, सोनम कपूर (Sonam Kapoor)आणि तिचा भाऊ हर्षवर्धन कपूर, सैफ अली खान आणि सोहा अली खान. अनेकवेळा हे कलाकार आपल्या भाऊ बहिणीसोबतचे थ्रोबॅक फोटो शेअर करत असतात. त्यांचे बालपणीचे फोटो  पाहून त्यांना ओळखणंही कठीण जाते. 

अशाच एक बॉलिवूडमधील भाऊ बहिणीची जोडी आहे जे आपल्या बालपणीचे एकमेंकासोबतचे फोटो नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. आम्ही तुम्हाला हिंट देतो. हा अभिनेता एक उत्तम दिग्दर्शकही आहे आणि बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तर बहिणी प्रसिद्धी निर्माती आहे. 

ही जोडी म्हणजे अभिनेता फराहन अख्तर (Farhan Akhtar) आणि त्याची बहीण झोया अख्तर(Zoya Akhtar)ची.. फरहान आणि झोयाची जोडीने जिंदगी मिलेगी ना दुबारासारखा हिट सिनेमा बॉलिवूडला दिला आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या, जोया अख्तर आणि रीमा कागतीद्वारे लिखित 'गली बॉय'ने केवळ बॉक्स ऑफिसवरचेच सगळे रिकॉर्ड तोडले नाहीत तर प्रेक्षकांच्या मनात देखील आपले स्पेशल स्थान बनवण्यात यश मिळवले. या सिनेमाचे दिग्दर्शनही झोयानेच केलं होतं. झोयाला गली बॉय आणि  जिंदगी मिलेगी ना दुबारासारख्या सिनेमासांठी बेस्ट डायरेक्टरच्या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे. 

टॅग्स :फरहान अख्तरसेलिब्रिटी