तुम्हाला माहितेय का बिग बॉस १चा विजेता राहुल रॉय सध्या काय करतोय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 12:23 IST
बिग बॉस या कार्यक्रमाचा पहिला सिझन चांगलाच गाजला होता. या कार्यक्रमाविषयी सुरुवातीला प्रेक्षकांना प्रचंड कुतूहल वाटले होते. त्यामुळे अनेकांनी ...
तुम्हाला माहितेय का बिग बॉस १चा विजेता राहुल रॉय सध्या काय करतोय?
बिग बॉस या कार्यक्रमाचा पहिला सिझन चांगलाच गाजला होता. या कार्यक्रमाविषयी सुरुवातीला प्रेक्षकांना प्रचंड कुतूहल वाटले होते. त्यामुळे अनेकांनी हा सिझन आवर्जून पाहिला होता. या सिझनमध्ये राहुल रॉय, कॅरल ग्रेशियस, रवी किरण, राखी सावंत, रूपाली गांगुली, दीपक तिजोरी, अमित संध, कश्मिरा शहा, बॉबी डार्लिंग यांसारखे खूप चांगले सेलिब्रिटी प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. त्यांनी प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केले होते. राहुल रॉय या कार्यक्रमाचा विजेता ठरला होता तर कॅरल आणि रवी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर होते.राहुल रॉय त्याच्या आशिकी या त्याच्या पहिल्याच चित्रपटामुळे चांगलाच फेमस झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता. आजही या चित्रपटाची गाणी प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. या चित्रपटानंतर त्याने जुनुन, पहला नशा, सपने साजन के यांसारख्या चित्रपटात काम केले. पण २००० नंतर तो मोठ्या पडद्यावर खूपच कमी झळकला. त्याची छोट्या पडद्यावर ग्रँड एंट्री २००६ मध्ये बिग बॉस या कार्यक्रमाद्वारे झाली. बिग बॉसच्या पहिल्या भागापासूनच त्याला मजबूत दावेदार मानले गेले होते. बिग बॉस जिंकल्यावर त्याला प्रसिद्धी, पैसा सगळे काही मिळाले होते. बिग बॉस जिंकल्यानंतरही राहुल छोट्या आणि मोठ्या पडद्यापासून दूर राहिला. आता तो 2016 द एंड या चित्रपटात झळकणार आहे. विशेष म्हणजे तो या चित्रपटात प्रेक्षकांना एका नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. जयदीप चोप्रा 2016 द एंड या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून हा त्यांचा दुसरा चित्रपट आहे. 2016 द एंड या चित्रपटातील राहुलच्या भूमिकेविषयी ते सांगतात, राहुल यांचे नाव कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने सुचवले होते. राहुल या चित्रपटात प्रेक्षकांना नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. ते जवळजवळ १७ वर्षांनंतर नकारात्मक भूमिकेत झळकत आहेत. मी कॉलेजमध्ये असताना माझ्या प्रेयसीसोबत पाहिलेला सगळ्यात पहिला चित्रपट हा आशिकी होता. राहुल माझ्या चित्रपटात काम करत असल्याने माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. Also Read : तुम्हाला माहीत आहे का बिग बॉस ११चा स्पर्धक हितेन तेजवानीचे गौरी प्रधानसोबत आहे दुसरे लग्न