Join us  

नाना पाटेकरांच्या मांडीवर बसलेल्या या मुलाला ओळखलंत का?, या अभिनेत्याचं बिग बींच्या नातीसोबत जोडलं जातंय नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 6:36 PM

बॉलिवूडच्या एका अभिनेत्याच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतो आहे. ज्यात नाना पाटेकर यांच्या मांडीवर बसलेला मुलगा पाहायला मिळतो आहे.

बॉलिवूड आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील बरेच सेलिब्रेटी सोशल मीडियावर बालपणीचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या या बालपणीचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. असाच बालपणीचा फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतो आहे. ज्यात नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्या मांडीवर बसलेला मुलगा पाहायला मिळतो आहे. या मुलाला ओळखलंत का? हा दुसरा तिसरा कुणी नसून अभिनेता मिजान जाफरी (Meezan Jaaferi) आहे. मिजान जाफरीनेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर  नाना पाटेकर यांच्यासोबत बालपणीचा आणि आताचे फोटो शेअर केले आहेत. 

मिजान जाफरीने इंस्टाग्रामवर नाना पाटेकर यांच्यासोबतचे फोटो शेअर करत लिहिले की, खूप उत्सुक आहे पण. कंट्रोल मिजान. नाना सरांसह चौथ्या चित्रपटात.त्यांच्यासोबत स्क्रिन शेअर करण्याचा मान मिळाला. खूप काही शिकण्यासारखे आहे.

मिजान जाफरीने संजय लीला भन्साळी यांच्या बॅनरखाली बनलेल्या मलाल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्यासोबत या चित्रपटातून संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मिन सेहगल हिने देखील पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही.

मिजान त्याच्या चित्रपटांपेक्षा अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाला डेट करत असल्याच्या चर्चेत जास्त असतो. काही महिन्यांपूर्वी मिजान व नव्या यांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या दोघांच्या अफेयरचे वृत्त समोर आले होते. मात्र याप्रकरणी मिजान जाफरीने खुलासा केला होता. त्याने सांगितले होते की, नव्या त्याच्या बहिणीची बेस्ट फ्रेंड आहे आणि ती त्याचीदेखील खूप चांगली मैत्रीण आहे.

टॅग्स :मिजान जाफरीनाना पाटेकर