Join us  

“Don't Miss It! सलमान खानने चाहत्यांना दिली प्रजासत्ताक दिनाची भेट; ‘भारत’चा टीजर रिलीज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 11:51 AM

सलमान खानचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून ‘भारत’ या चित्रपटाच्या टीजरकडे डोळे लावून बसले होते. आज भाईजानने आपल्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाची भेट देत, ‘भारत’चा टीजर जारी केला.

ठळक मुद्देया टीजरमध्ये सलमान पाच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतोय. त्याचे हे पाचही लूक चाहत्यांसाठी सरप्राईजिंग आहेत, हे सांगायला नकोच.

सलमान खानचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून ‘भारत’ या चित्रपटाच्या टीजरकडे डोळे लावून बसले होते. आज भाईजानने आपल्या चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाची भेट देत, ‘भारत’चा टीजर जारी केला. यातील सलमानचा दमदार अ‍ॅक्शन अवतार पाहण्यासारखा आहे. या टीजरमध्ये सलमान पाच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतोय. त्याचे हे पाचही लूक चाहत्यांसाठी सरप्राईजिंग आहेत, हे सांगायला नकोच.गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. अली अब्बासने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सलमानसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. टीजरमध्ये तिची झलक पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण टीजरमध्ये कॅटरिना नाही. सगळा फोकस फक्त आणि फक्त सलमानवर आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्ताला रिलीज होणा-या या चित्रपटाचा हा दमदार टीजर भाईजानच्या चाहत्यांनी तरी मिस करायला नको. तेव्हा पाहा आणि कसा वाटला ते नक्की कळवा...

‘भारत’ हा चित्रपट ह्यआॅड टू माई फादरह्ण या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़  यात सलमान २० ते ६० वयाचे अनेक टप्पे साकारताना दिसणार आहे़  म्हणजेच सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत़  प्राप्त माहितीनुसार, सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात त्याला कॅटरिना व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न.   

टॅग्स :सलमान खानभारत सिनेमाकतरिना कैफ