Don't miss : कान्समधील ऐश्वर्या, दीपिका व सोनमचे काही candid फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 15:12 IST
ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पादुकोण, सोनम कपूर या तिघींनीही कान्स फिल्म्स फेस्टिवल खºया अर्थाने गाजवला. तिघींनीही खूप वाहवाह लुटली. ...
Don't miss : कान्समधील ऐश्वर्या, दीपिका व सोनमचे काही candid फोटो!!
ऐश्वर्या राय बच्चन, दीपिका पादुकोण, सोनम कपूर या तिघींनीही कान्स फिल्म्स फेस्टिवल खºया अर्थाने गाजवला. तिघींनीही खूप वाहवाह लुटली. ऐश्वर्याचा घायाळ करणारा अंदाज, दीपिकाचा ग्लॅमरस लूक आणि सोनमचा सेक्सी अवतार पाहून अनेकांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. कान्सच्या रेड कार्पेटवरील यांचा लूक तर पाहण्यासारखा होता. या तिघींनीही रेड कार्पेट, प्रेस मिट यादरम्यान फोटोग्राफर्सला अनेक पोज दिल्यात. पण काही फोटो युनिक असतात. ते फोटो प्रॉपर पोज देणाºया फोटोंपेक्षा कित्येकपट सुंदर आणि सहज असतात. दीपिका, ऐश्वर्या व सोनमच्या कान्समधील असेच काही कॅन्डीड फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात दीपिकाच्या ग्रीन रेड कार्पेट लूक्सपासून तर ऐश्वर्याचा व्हाईट फ्लावरी ड्रेस आणि सोनमच्या ट्रॅडिशनल लूकपर्यंतचे अनेक फोटो आहेत. कान्ससाठी तयार होणाºया दीपिकाच्या ओठांवरचे हे हसू पाहा. यात दीपिका कमालीची सुंदर दिसतेय. दीपिकाचे असेच आणखी काही फोटो आहेत. ऐश्वर्याला पाऊट करताना पाहणेही, असाच एक सुंदर अनुभव आहे. त्याचा एक फोटोही आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. जगभरात कान्स फिल्म फेस्टिवलला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जागतिक पातळीवरचे फिल्म्स अॅण्ड ग्लॅमर इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी या सोहळ्यात सहभागी होतात. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा या सोहळ्याकडे लागलेल्या असतात. यंदा बॉलिवूडची सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन, बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूर आणि बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण या तीन अभिनेत्री यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर उतरल्या. याठिकाणी यातिघींनी याठिकाणी एका आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँडचे प्रतिनिधित्व केले. केवळ प्रतिनिधित्वच केले नाही तर भारतीय अभिनेत्री म्हणून कान्समध्ये त्या मोठ्या अभिमानाने मिरवल्या.