बॉलिवूडचा 'राज ' बनायचे नाही - रणदीप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:30 IST
अभिनेता रणदीप हुडा म्हणतो की,' मला कधीही बॉलीवूडचा 'राज' बनण्याची इच्छा नव्हती. ' ३९ वर्षीय अभिनेता रणदीप हुडा आगामी ...
बॉलिवूडचा 'राज ' बनायचे नाही - रणदीप...
अभिनेता रणदीप हुडा म्हणतो की,' मला कधीही बॉलीवूडचा 'राज' बनण्याची इच्छा नव्हती. ' ३९ वर्षीय अभिनेता रणदीप हुडा आगामी 'मैं और चार्ल्स' मध्ये दिसणार आहे. रणदीप हुडा त्याच्या बॉलीवूडकडून असलेल्या अपेक्षा बोलून दाखवतांना म्हणाला,' राज सारखी भूमिका करणे हे माझ्यासाठी कधीच ध्येय नव्हते. मी एखाद्या भूमिकेची कॉपी पुन्हा होऊ देणार नाही.मला सांगा प्रत्येक पत्रकार सारखा असतो का? तर नाही. मग भूमिका का बरे सारख्या असाव्यात? मी आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांवरून मी बरेच काही शिकलो. हायवे, रंगरसीया, वन्स अपॉन अ टाईम यांमधील माझ्या भूमिका या खुप वेगवेगळया असून मला नवीन काही शिकायला त्यातून मिळत आहे. माझ्यात काय क्षमता आहेत ते ही मला कळत आहे. '