Join us

‘स्टारडम’ वर विश्वास नाही -आयुषमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 17:40 IST

आयुषमान खुराना सारखा उत्तम सूत्रसंचालक, गायक, गुणी अभिनेता ‘बी टाऊन’ ला अल्पावधीत लाभला. सूत्रसंचालकापासून सुरू झालेल्या त्याच्या प्रवासात प्रचंड ...

आयुषमान खुराना सारखा उत्तम सूत्रसंचालक, गायक, गुणी अभिनेता ‘बी टाऊन’ ला अल्पावधीत लाभला. सूत्रसंचालकापासून सुरू झालेल्या त्याच्या प्रवासात प्रचंड मेहनत, स्ट्रगल, कष्ट उपसावे लागले. तेव्हा आज या यशाची किंमत त्याला आहे. पण, तरीही ‘बी टाऊन’ च्या कलाकारांना जे ‘स्टारडम’ मिळते त्याच्यावर माझा विश्वास नाही, असे तो स्पष्टपणे सांगतो. ‘खरं स्टारडम राजेश खन्ना, सलमान खान, शाहरूख खान,आमिर खान यांनी अनुभवलं आणि अनुभवत आहेत. मात्र, हे स्टारडम काही कायमस्वरूपी नाहीये. कारण, नवनवे कलाकार इंडस्ट्रीत येऊ पाहत आहेत. इंडस्ट्रीत आल्यावर प्रत्येक कलाकाराला स्वत:ची जागा निर्माण करावयाची असते. त्यामुळे प्रस्थापित कलाकारांचं स्टारडम क्षणिक होऊन जातं,’ असं मला वाटतं.‘मनमर्जियाँ’ आणि ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटासाठी तो सध्या शूटिंग करतो आहे. परिणीती चोप्रा आणि भूमी पेडणेकर यांच्यासोबत तो रोमान्स करताना दिसणार आहे. भूमीसोबत त्याचा ‘मनमर्जियाँ’ हा दुसरा चित्रपट असून ‘मेरी प्यारी बिंदू’ मध्ये तो परिणीतीसोबत प्रथमच दिसणार आहे.