Join us  

मध्यरात्री रेडलाइट एरियात अडकली बॉलिवूड अभिनेत्री; पुढे घडला अंगावर काटा आणणारा प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 3:30 PM

Bollywood actress: रोकठोक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री रेड लाइट एरियात अडकल्यानंतर तिच्या तोंडचं पाणी पळालं होतं.

रेड लाईट एरिया म्हटलं की आजही अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. तर, काहींच्या कपाळावर आठ्या पडतात. इतकंच नाही तर या भागाविषयी अनेक समज-गैरसमज समाजात आहे. त्यामुळे या भागाचं नाव घेताना आजही अनेक जण नाकं मुरडतात. विशेष म्हणजे याच भागात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मध्यरात्री अडकली होती. याविषयी तिने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

बॉलिवूड कलाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणजे दिव्या दत्ता. आजवरच्या कारकिर्दीत दिव्या दत्ताने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. पंजाबमधील लुधियाना येथे लहानाची मोठी झालेल्या दिव्याने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आजवर तिच्या अनेक भूमिका गाजल्या. अभिनयासह रोकठोक वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री एकदा चक्क रेड लाइट एरियात अडकली होती. यावेळी तिच्यासोबत घडलेला किस्सा तिने सांगितला.

२००५ साली दिव्या तिच्या आईसोबत अॅमस्टरडॅममध्ये येथे आयोजित आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी गेली होती. यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर ती तिच्या आईसोबत शहर फिरण्यासाठी निघाली. मात्र, फिरता फिरता ती थेट रेड लाइट एरियात पोहोचली. विशेष म्हणजे या भागात ती आईसोबत फोटो काढत असताना तेथील वेश्याव्यवसायिकांनी तिला घेरलं. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे दिव्या प्रचंड घाबरली. या परिस्थिती काय करावं हे तिला समजेना. परंतु, या परिस्थितीतून सुटका करुन घेण्यासाठी दिव्या आणि तिची आई जोरात धावू लागल्या. दिव्याला असं धावताना पाहून तेथील स्त्रियादेखील त्यांच्या मागे धावायला लागल्या.

दरम्यान, या ठिकाणाहून दिव्याने आणि तिच्या आईने कसंबसं करुन स्वत:ला वाचवलं. विशेष म्हणजे हा प्रसंग आठवल्यानंतर आजही दिव्याच्या अंगावर काटा येतो असं ती म्हणते. दिव्याने १९९४ मध्ये मॉडेलिंग क्षेत्रातून कलाविश्वात पदार्पण केलं. 'इश्क में जीना इश्क में मरना' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने 'सुरक्षा' या चित्रपटात काम केलं. हा चित्रपट 1995 ला प्रदर्शित झाला होता. त्यानंतर ती 'वीर-जारा', 'इरादा', 'ब्लॅकमेल', 'बदलापूर', 'भाग मिल्खा भाग', 'स्पेशल 26', 'हिरोईन', 'दिल्ली 6', 'उमराव जान', 'लुटेरा', 'चॉक अँड डस्टर', 'मंटो', 'फन्ने खान' आणि 'इरादा' यांसारख्या सिनेमांमध्ये झळकली आहे. 

टॅग्स :दिव्या दत्तासेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा