Join us

अईयो, काय झाले ट्विटर? ; दिव्या दत्ताचा एकच सवाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 19:12 IST

 बदलापूर, भाग मिल्खा भाग, इरादा, वीरजारा, दिल्ली6 अशा अनेक चित्रपटांत दिसलेली अभिनेत्री दिव्या दत्ता हिच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या अचानक घटली. 

 बदलापूर, भाग मिल्खा भाग, इरादा, वीरजारा, दिल्ली6 अशा अनेक चित्रपटांत दिसलेली अभिनेत्री दिव्या दत्ता हिच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या अचानक घटली. तासाभरात अचानक फॉलोअर्सची संख्या घटल्याने दिव्याही टेन्शनमध्ये आली आणि तिने ट्विटरलाच याचा जाब विचारणे योग्य समजले. गुरूवारी रात्री उशीरा तिने याबाबत ट्विट केले. ‘अईयो, काय झाले ट्विटर? केवळ तासाभरात फॉलोअर्सच्या संख्येत इतकी मोठी घट..’, असे तिने लिहिले.

दिव्या दत्ताचे तूर्तास ४ लाखांवर फॉलोअर्स आहेत. खरे तर फॉलोअर्स घटण्याची ही घटना पहिली घटना नाही. याआधीही अमिताभ बच्चन यांच्यासोबत असे झाले होते. अमिताभ यांनीही याबद्दल ट्विटरला जाब विचारला होता.तूर्तास दिव्या दत्ता ही ‘फन्ने खां’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका आहेत. ऐश्वर्या रायचा यात केवळ २० मिनिटांची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट ‘एव्हरीबडीस् फेमस’ या बेल्जिअम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. याशिवाय नोबेल विजेती मलाला युसूफजाई हिचे बायोपिक ‘गुल मकई’मध्येही दिव्या महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.