Join us

दिव्या भारतीची बहीण देखील आहे अभिनेत्री, पाहा तिचे फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 19:37 IST

दिव्याच्या अभिनयाचे, सौंदर्याचे आजही अनेक चाहते आहेत. तिच्या इतकीच तिची बहीण देखील अतिशय सुंदर आहे.

ठळक मुद्देखट्टा मिठा या चित्रपटातील आयला रे आयला या आयटम साँगमध्ये कायनात झळकली होती. तसेच कायनातने ग्रँड मस्ती या चित्रपटात देखील काम केले होते. 

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती सुंदर अभिनेत्रींपैकी एक असून तिने तिच्या लूक्स आणि निरागसतेने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. दिव्याचा आज वाढदिवस आहे. तिच्या कुटुंबियातील कोणाचाच या क्षेत्राशी संबंध नव्हता. पण खूपच कमी वयात तिने अभिनयक्षेत्रात प्रवास केला. तिने बॉलिवूडवर अनेक वर्षं राज्य केले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

दिव्या भारतीची बहीण देखील तिच्याप्रमाणे अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.  दिव्याच्या अभिनयाचे, सौंदर्याचे आजही अनेक चाहते आहेत. तिच्या इतकीच तिची बहीण देखील अतिशय सुंदर आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. तिच्या बहिणीचे नाव कायनात अरोरा असून तिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगते.

खट्टा मिठा या चित्रपटातील आयला रे आयला या आयटम साँगमध्ये कायनात झळकली होती. तसेच कायनातने ग्रँड मस्ती या चित्रपटात देखील काम केले होते. 

कायनातने मॉडलिंगद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. कायनात दिव्याची चुलत बहीण असून तिने कॅडबरी, मारूती, लक्स यांसारख्या अनेक प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. कायनातने हिंदी सोबतच काही मल्याळी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

तीन वर्षांच्या छोट्या सिने कारकिर्दीत दिव्या भारतीने अनेक सुपरहिट सिनेमे दिले होते. वयाच्या १९व्या वर्षी अपार्टमेंटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ५ एप्रिल १९९३ रोजी जवळपास रात्री ११ वाजता अचानक दिव्या भारतीचे निधन झाले.

दिव्या मुंबईतील वर्सोवा येथील तिच्या पाचव्या मजल्यावरील अपार्टमेंटच्या बाल्कनीतून पडली. सकाळपर्यंत दिव्याच्या निधनाचे वृत्त सिनेइंडस्ट्रीत पसरलं. दोन दिवसानंतर दिव्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या निधनानंतर असंख्य प्रश्न उभे ठाकले होते.

टॅग्स :दिव्या भारती