Join us  

​ दिव्या भारतीच्या ‘या’ चुलत बहिणीला मिळेना बॉलिवूडमध्ये काम!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2018 1:07 PM

 ९० च्या दशकातील सुपरडुपर हिट अभिनेत्री दिव्या भारती हिला कोण बरे विसरू शकेल. या अभिनेत्री लाखो चाहत्यांना जणू वेड ...

 ९० च्या दशकातील सुपरडुपर हिट अभिनेत्री दिव्या भारती हिला कोण बरे विसरू शकेल. या अभिनेत्री लाखो चाहत्यांना जणू वेड लावले होते. पहिल्याच चित्रपटाने दिव्या भारतीला अमाप यश मिळवून दिले. एका रात्रीत ती स्टार झाली. पण आज आम्ही दिव्याची नाही तर तिच्या दुरच्या चुलत बहिणीची गोष्ट करतोय. होय, तिचे नाव आहे, कायनात अरोरा.कायनात दिव्यासारखीच  सुंदर आहे. पण दिव्या भारतीने कमी वयात जे काही मिळवलं, ते ऐश्वर्य, प्रसिद्धी मिळवण्यात कायनात मात्र काहीशी कमनशिबी ठरली आहे. अक्षय कुमारच्या ‘खट्टा मिठा’ या चित्रपटातील ‘आइला रे आइला’ या आयटम साँगमध्ये  कायनात होती. या आयटम साँगद्वारे कायनातने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. यानंतर २०१३ मध्ये आलेल्या व १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील असलेल्या ‘ग्रँड मस्ती’ या चित्रपटात कायनात दिसली होती. मारलो नावाची भूमिका तिने यात साकारली होती. त्यापूर्वी रामगोपाल वर्मांच्या ‘सीक्रेट’मध्ये ती दिसली. याशिवाय अनेक मल्याळम, तेलगू, पंजाबी चित्रपटातही तिची वर्णी लागली.  पण  दिव्यासारखे स्टारडम मात्र तिला मिळवता आले नाही. आता तर कायनातच्या हाताला काम नसल्याचे कळतेय. २०१५ मध्ये मध्ये ‘फरार’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. तेव्हापासून कायनात बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही.ALSO READ : ​दिव्या भारतीच्या मृत्यूनंतर २५ वर्षांनी झाला आईचा मृत्यू, वडील पडले एकाकी२ डिसेंबर १९८२ मध्ये जन्मलेल्या कायनातला काही लोक चारू अरोरा नावानेही ओळखतात. मध्यंतरी सोशल मीडियावर एका महिला पोलिस अधिका-याचा फोटो वा-यासारखा व्हायरल झाला होता. हा फोटो पंजाबच्या बठींडा ठाण्याची स्टेशन हाऊस आॅफिसर हरलीन मानचा असल्याचे म्हटले गेले होते. पण तो फोटो प्रत्यक्षात कायनातचा होता. हा फोटो कायनातच्या ‘जग्गा जेऊंदा’ या पंजाबी चित्रपटातील असल्याचे तिने स्वत: स्पष्ट केले होते.