Join us  

शाहरुख, अजयला विसरा! रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात दिसणार ‘हा’ सुपरस्टार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 11:31 AM

रोहित शेट्टीच्या एकंदर करिअरवर नजर टाकली की, एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. ती म्हणजे, रोहितने बहुतांश चित्रपटात अजय देवगण व शाहरुख खानसोबत काम केले आहे. पण आता रोहितने अजय व शाहरुखवगळता अनेक नवनव्या स्टार्ससोबत काम करण्याचे मूड बनवले आहे.

ठळक मुद्देहोय, यावर्षाअखेरिस रिलीज होऊ घातलेल्या  ‘सिम्बा’ या चित्रपटात रोहित पहिल्यांदा रणवीर सिंगसोबत काम करतोय. केवळ इतकेच नाही तर आता रोहितच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ‘सिम्बा’नंतर रोहित अक्षय कुमारसोबत काम करताना दिसणार आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी ‘फुल आॅन मसाला एंटरटेनर्स’ चित्रपटांसाठी ओळखला जातो. रोहित शेट्टीच्या एकंदर करिअरवर नजर टाकली की, एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. ती म्हणजे, रोहितने बहुतांश चित्रपटात अजय देवगण व शाहरुख खानसोबत काम केले आहे. पण आता रोहितने अजय व शाहरुखवगळता अनेक नवनव्या स्टार्ससोबत काम करण्याचे मूड बनवले आहे. होय, यावर्षाअखेरिस रिलीज होऊ घातलेल्या  ‘सिम्बा’ या चित्रपटात रोहित पहिल्यांदा रणवीर सिंगसोबत काम करतोय. केवळ इतकेच नाही तर आता रोहितच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ‘सिम्बा’नंतर रोहित अक्षय कुमारसोबत काम करताना दिसणार आहे.डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार, ‘सिम्बा’नंतर रोहितच्या आगामी चित्रपटासाठी रोहितने अक्षयला साईन केले आहे.

या चित्रपटासाठी अक्षयने आपल्या डेट्स दिल्याचीही खबर आहे. रोहितचा हा चित्रपट पुढील वर्षी सुरू होईल. या चित्रपटाच्या शूटींगसोबतचं अक्षय कुमार ‘केसरी’ या चित्रपटाचे प्रमोशनही करेल. रोहित व अक्षयच्या या चित्रपटाचे नाव काय, त्याची स्टोरी काय, हे अद्याप कळलेले नाही. पण रोहित व अक्षय एकत्र दिसणार म्हटल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. रोहितचा ‘सिम्बा’ येत्या २८ डिसेंबरला  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   हा  चित्रपट साऊथच्या ‘टेम्पर’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. ‘सिम्बा’मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे. यात रणवीरपहिल्यांदा पोलिस कर्मचा-याच्या भूमिकेत आहे.  तूर्तास अक्षय कुमार प्रचंड बिझी आहे. एकाचवेळी तो अनेक चित्रपटांवर काम करतोय. ‘हाऊसफुल 4’, ‘केसरी’, ‘गुड न्यूज’ असे अनेक चित्रपट त्याच्याकडे आहेत.२०११ मध्ये रिलीज झालेल्या ‘कंचना- मुनी2’ या तामिळ हॉरर कॉमेडीच्या हिंदी रिमेकमध्ये अक्की झळकणार असल्याचीही खबर आहे.

टॅग्स :रोहित शेट्टीअक्षय कुमारशाहरुख खानअजय देवगणसिम्बा