हिट चित्रपटांच्या दिग्दर्शकापासूनही दुरावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 14:39 IST
याचे पहिले उदाहरण राजकंवर आहेत. ज्यांनी शाहरुख खानच्या करिअरचा पहिला सुपरहिट चित्रपट 'दीवाना' बनविला होता. 'दीवाना' नंतर राजकंवरच्या दिग्दर्शनातील ...
हिट चित्रपटांच्या दिग्दर्शकापासूनही दुरावा
याचे पहिले उदाहरण राजकंवर आहेत. ज्यांनी शाहरुख खानच्या करिअरचा पहिला सुपरहिट चित्रपट 'दीवाना' बनविला होता. 'दीवाना' नंतर राजकंवरच्या दिग्दर्शनातील अजून एक चित्रपट 'हर दिल जो प्यार करेगा' (सलमान खान-रानी मुखर्जी-प्रिती झिंटा) यात शाहरुखने पाहुणा कलाकार म्हणून काम केले होते. याशिवाय राजकंवरच्या कोणत्याही चित्रपटात शाहरुखने काम केले नाही. राजकंवर फक्त एकच उदाहरण नाही. अब्बास मस्तानही या यादीत आहेत. सस्पेंस-थ्रिलर चित्रपटांचे चॅँपियन म्हटले जाणार्या या दिग्दर्शकाच्या जोडीने शाहरुख सोबत एकापाठोपाठ 'बाजीगर' आणि नंतर 'बादशाह' बनविला. मात्र दोन्ही चित्रपट हिट होऊनही अब्बास-मस्तानच्या जोडी सोबत शाहरुख खानचे काय बिनसले हे कळायला मार्ग नाही. परंतु 'बादशाह' नंतर चित्रपटांच्या या बादशाहने कधी त्यांच्या चित्रपटात काम नाही केले. शाहरुख खानच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात दिग्दर्शक राजीव मेहरांनी त्याला खूप साथ दिली. 'चमत्कार' नंतर 'रामजाने'आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला, मात्र 'रामजाने' हिट झाल्यानंतर शाहरुख खान पुन्हा कधी राजीव मेहरा सोबत कोणत्या चित्रपटात काम करताना दिसला नाही. आमीरचा चूलत भाऊ मंसूर खान सोबत शाहरुखचा चित्रपट 'जोश' आला. हा चित्रपट हिट झाला. मात्र पुन्हा मंसूर खान सोबत शाहरुख कधी एकत्र आला नाही. सुभाष घईंनी शाहरुखला 'त्रिमूर्ती'मध्ये कास्ट के ले. यानंतर 'परदेस' आला. पण, नंतर काही ही हिट जोडी सोबत आली नाही. 'स्वदेस'ला शाहरुख खानचा वन आफ बेस्ट चित्रपट मानला जातो. मात्र आशुतोष गोवारीकर सोबत 'स्वदेस नंतर किंग खानने पुन्हा कधी काम केले नाही.