दिशा म्हणते,‘मी लकी!’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 16:41 IST
अभिनेत्री दिशा पाटणी ही चायनीज सुपरस्टार जॅकी चॅन याच्यासोबत ‘कुंग फु योगा’ मध्ये काम करत आहे. ती म्हणते,‘ मी ...
दिशा म्हणते,‘मी लकी!’
अभिनेत्री दिशा पाटणी ही चायनीज सुपरस्टार जॅकी चॅन याच्यासोबत ‘कुंग फु योगा’ मध्ये काम करत आहे. ती म्हणते,‘ मी प्रोजेक्टमध्ये जॅकी सरांसोबत काम करते आहे, याचा मला अत्यंत आनंद होतोय. मी स्वत:ला खुप लकी मानते की, मला त्यांच्यासोबत काम करायला मिळते आहे.एम.एस.धोनी याच्या बायोपिकवर काम करायला मिळाल्याने माझा आत्मविश्वास वाढलेला दिसतोय. पण, चायनीज चित्रपटसृष्टीच्या एवढ्या मोठ्या व्यक्तीसोबत मला काम करायला मिळते आहे.’‘कुंग फु योगा’ हा एक अॅक्शन-अॅडव्हेंचर आधारित कॉमेडी चित्रपट असून अमीरा दस्तुर, आरिफ रहमान आणि सोनु सुद हे कलाकार त्यात असतील.