दिशा पाटनीने सिक्स पॅक अॅब्ज दाखविताच यूजर्सनी म्हटले, ‘खात-पित जा, नुसतीच हाडं दिसत आहेत’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 20:05 IST
दिशा पाटनीने तिचा एक फोटो शेअर करताच तिला ट्रोल केले जात आहे. अनेक यूजर्सनी तिच्यावर टीका करणाºया प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दिशा पाटनीने सिक्स पॅक अॅब्ज दाखविताच यूजर्सनी म्हटले, ‘खात-पित जा, नुसतीच हाडं दिसत आहेत’!
अभिनेत्री दिशा पाटनीचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबतचा ‘बागी-२’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करीत आहे. चित्रपटात दिशा आणि टायगरची जबरदस्त केमिस्ट्री बघावयास मिळत आहे. एकीकडे टायगर आपल्या डान्स आणि अॅक्शन-स्टंटमुळे प्रेक्षकांची मने जिंकत आहे, तर दुसरीकडे दिशानेही आपल्या हॉटनेसचा तडका लावत प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. दरम्यान, दिशा आता तिच्या एका फोटोवरून चर्चेत आली असून, यामध्ये ती आपले सीक्स पॅक अॅब्स दाखविताना दिसत आहे. फोटोमध्ये दिशा टी-शर्ट वर करीत अॅब्स दाखवित आहे. ज्यामध्ये तिचे अॅब्ज स्पष्टपणे दिसत आहेत. दिशाने तिचा हा फोटो शेअर करताच चाहत्यांकडून त्यास तुफान पसंत केले जात आहे. मात्र काहींना दिशाचा हा फोटो खूपच मजेशीर वाटत आहे. कारण अनेक यूजर्सला दिशाचा हा अंदाज अजिबातच पसंत आला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे सध्या दिशा या फोटोवरून ट्रोल होत आहे. काही चाहत्यांनी तिच्या फिटनेसचे कौतुक केले, तर काहींनी दिशाला ‘काहीतरी खात-पित जा, नुसतीच हाडं दिसत आहेत’ असा सल्लाही दिला. एका यूजरने लिहिले की, ‘आता काहीतरी खा प्लीज, वर्कआउट एक काम आहे. मात्र आयुष्य आणि आरोग्य सर्व काही आहे.’ दुसºया एका यूजरने लिहिले की, ‘तुला सिक्स पॅक का हवे आहेत, एवढं तर टायगरसाठी सोड’! दरम्यान, दिशा आणि टायगरचा ‘बागी-२’ हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट सध्या बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कलेक्शन करीत आहे. पहिल्याच दिवशी मोठी ओपनिंग मिळाल्याने, चित्रपट आगामी काळात किती कमाई करेल याविषयी अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान, आतापर्यंत चित्रपटाने शंभर कोटींचा क्लब पार केला आहे.