Join us

डिप्पीने केले चकली अन् केळी चिप्स फस्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 01:27 IST

दीपिका पदुकोन ही लॉस एंजलिस येथे आगामी हॉलीवूड चित्रपट ‘ट्रीपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ साठी विन ...

दीपिका पदुकोन ही लॉस एंजलिस येथे आगामी हॉलीवूड चित्रपट ‘ट्रीपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ साठी विन डिजेलसोबत शूटिंग करत आहे. चित्रपटाच्या शूटिंगपासून तिचे विविध अपडे्टस येत आहेत. नुकतेच असे एक अपडेट आले की, डिप्पी म्हणे तिच्या घराला खुप ‘मिस’ करते आहे. घरचं जेवण आणि खाद्याची तिला खुप आठवण येते आहे. मग, तिला घरून केळी चिप्स आणि चकली पाठवण्यात आली. ती ते पाहून एवढी खुश झाली की, तिने चकली आणि केळी चिप्सचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्या फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘ मिसिंग होम...कम्फर्ट फुड.’ }}}}