Join us  

अक्षय कुमार अद्यापही करतोय प्रतीक्षा, सासूबाईला मिळाला इतका मोठा हॉलिवूड सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 11:36 AM

इन्सेप्शन, दि प्रेस्टिज आणि इंटरस्टेलर यासारख्या उत्तमोत्तम हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीय. होय, ‘टेनेट’ असे या चित्रपटाचे नाव आहे.

ठळक मुद्दे डिंपल यांनी वयाच्या १६व्या वर्षी राज कपूर यांच्या ‘बॉबी’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.

इन्सेप्शन, दि प्रेस्टिज आणि इंटरस्टेलर यासारख्या उत्तमोत्तम हॉलिवूड चित्रपटाचे दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांनी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केलीय. होय, ‘टेनेट’ असे या चित्रपटाचे नाव आहे. मायकल केन, केनेथ ब्रानेज आणि एरॉन टेलर जॉन्सन यासारखे स्टार्स या चित्रपटात दिसणार आहेत. विशेष म्हणजे, अक्षय कुमारची सासूबाई आणि  ट्विंकल खन्नाची आई डिंपल कपाडिया या सुद्धा या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहेत. एक भारतीय मेनस्ट्रिम अ‍ॅक्टर क्रिस्टोफर नोलन यांच्या चित्रपटात काम करणार, असे पहिल्यांदाच घडणार आहे.

क्रिस्टोफर नोलन यांना यापूर्वी आलेला ‘डंकर्क’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. जगभर या चित्रपटाची चर्चा झाली होती. आता त्यांनी ‘टेनेट’साठी कंबर कसली आहे. ‘टेनेट’ हा चित्रपट एक अ‍ॅक्शन एपिक फिल्म असणार आहे. सात देशांत या चित्रपटांचे चित्रीकरण होणार आहे. नोलन आणि त्यांची पत्नी एम्मा थॉमस हा चित्रपट प्रोड्यूस करताहेत. पुढील वर्षी १७ जुलैला हा हॉलिवूडपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘मेमेन्टो’ या २००२ साली प्रदर्शित चित्रपटामुळे नोलन प्रसिद्धीझोतात आलेत. तेव्हापासून त्यांनी हॉलिवूडमधील अनेक आघाडीच्या अभिनेत्यांना घेऊन चित्रपट काढले आहेत.   २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘इन्सेप्शन’ या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमाला आॅस्कर पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. नोलन यांनी आजवर लिओनार्डो डिकॅप्रियो, अल पचिनो, क्रिश्चन बेल, मॉर्गन फ्रीमन, अ‍ॅन हॅथवे, मॅथ्यू मॅक्कॉनेही अशा अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांना आपल्या सिनेमांत कामे दिली आहेत.

 डिंपल यांनी वयाच्या १६व्या वर्षी राज कपूर यांच्या ‘बॉबी’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याच वर्षी डिंपल यांचा राजेश खन्ना यांच्याशी विवाह झाला आणि त्यांनी अभिनयापासून फारकत घेतली. १९८४ मध्ये राजेश खन्नापासून विभक्त झाल्यावर त्या पुन्हा अभिनयाकडे वळल्या. नंतर आलेल्या ‘सागर’ चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 

टॅग्स :डिम्पल कपाडियाअक्षय कुमारट्विंकल खन्ना