डिम्पल कपाडियामुळेच हेमामालिनी अन् सनी देओलमध्ये घडला समेट, वाचा सविस्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 18:04 IST
आजकाल सेलिब्रेटीजच्या आॅटोबायोग्राफी खूपच चर्चेत आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या An Ordinary Life: A Memoir या पुस्तकात अनेक खळबळजनक खुलासे केल्याने ...
डिम्पल कपाडियामुळेच हेमामालिनी अन् सनी देओलमध्ये घडला समेट, वाचा सविस्तर!
आजकाल सेलिब्रेटीजच्या आॅटोबायोग्राफी खूपच चर्चेत आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या An Ordinary Life: A Memoir या पुस्तकात अनेक खळबळजनक खुलासे केल्याने तो सातत्याने चर्चेत राहत आहे, तर काही दिवसांपूर्वीच प्रकाशित करण्यात आलेल्या हेमामालिनी यांची ‘ड्रीमगर्ल’ ही आॅटोबायोग्राफीदेखील काहीशी अशीच चर्चेत राहत आहे. या आॅटोबायोग्राफीचा काही भाग मिडडेने प्रकाशित केला आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांचा सावत्र मुलगा सनी देओल याचा उल्लेख केला आहे. हेमामालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत विवाह केल्यानंतर देओल परिवाराने त्यांना कधीही जवळ केले नाही. मात्र एका व्यक्तीने हेमामालिनी आणि देओल परिवारात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यातही सनी देओलसोबत त्यांचे संबंध सुधारण्यासाठी धडपड केली. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणीही नसून, सनी देओल याची एक्स गर्लफ्रेंड राहिलेली डिम्पल कपाडिया आहे. डिम्पल आणि हेमामालिनी एकेकाळच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. ज्यामुळेच हेमा आणि सनी यांच्यात चर्चेचा सिलसिला सुरू झाला होता. हेमा यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले की, त्याकाळी मी ‘दिल आशना’ या चित्रपटाची शूटिंग करीत होती. शाहरूख खानचीदेखील या चित्रपटात भूमिका होती, तर डिम्पल कपाडिया दिव्या भारतीच्या आईच्या भूमिकेत होती. चित्रपटातील एका गाण्यात विमानाचा एक सीन होता. मात्र शूटच्या काही दिवस अगोदरच पायलटचा अपघात झाला होता. त्यानंतर डिम्पल त्या सीनसाठी खूपच घाबरल्या होत्या. याची भनक सनीला लागली होती. तो डिम्पलला भेटण्यासाठी थेट सेटवर गेला. त्यावेळी सनी आणि हेमाची पहिल्यांदाच सेटवर भेट झाली होती. त्यावेळी हेमा यांनीच सनीची समजूत काढताना म्हटले होते की, हा सीन खूप सुरक्षित पद्धतीने शूट केला जाणार आहे. खरं तर ही भेट डिम्पलमुळे घडून आली होती. त्यावेळी सनी पहिल्यांदा त्याची सावत्र आई हेमामालिनी यांना भेटला होता. त्यावेळी सनी आणि डिम्पल रिलेशनशिपमध्ये असल्याने सनी डिम्पलला वारंवार भेटायला जात असे. त्याचकाळात तो हेमा यांना भेटला होता. असो, काही दिवसांपूर्वीच सनी आणि डिम्पल पुन्हा एकदा लंडन येथे भेटले होते. याबाबतचा त्यांचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये डिम्पल आणि सनी लंडन येथील एक बसस्टॉपवर बसले होते.