Join us  

दिलजीत दोसांझ आहे विवाहित आणि एका मुलाचा बाप? सोशल मीडियावर युझर्सने दिले पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 1:07 PM

पंजाबी गायक दिलजीत दोसांझ वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत

पंजाबी, हिंदी गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. त्याच्या गाण्यांवर तरुणाई बेधुंदपणे थिरकते. काही दिवसांपूर्वीच अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यात ग्लोबल स्टार गायिका रिहानापेक्षाही जास्त दिलजीतच्या कॉन्सर्टने धमाल आणली होती. सध्या दिलजीत वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आहे. ४० वर्षीय दिलजीत एका मुलाचा बाप असल्याची चर्चा सुरु आहे. दिलजीतने बायको आणि मुलाला लाईमलाईटपासून दूरच ठेवलं आहे. मात्र ही चर्चा कशी सुरु झाली जाणून घेऊया.

करिना कपूर, तब्बू आणि क्रिती सेननच्या आगामी 'क्रू' सिनेमातील दिलजीत दोसांझचं गाणं चांगलंच गाजतंय. तसंच दिलजीत करिनाचा मोठा चाहता आहे हे लपून राहिलेलं नाही. शिवाय तो हॉलिवड स्टार कायली जेनरचाही चाहता आहे. सोशल मीडियावर अनेकदा त्याने प्रेम व्यक्त केलं आहे. इतकंच नाही तर तिच्यावर गाणंही लिहिलं आहे. आता दिलजीत स्वत: विवाहित असल्याची चर्चा सुरु झाली आहे. इतकंच नाही तर त्याला एक मुलगाही आहे. दिलजीत दोसांझने किआरा अडवाणी, करिना कपूर आणि अक्षय कुमारसोबत 'गुडन्यूज' सिनेमात काम केले होते. तेव्हा एका मुलाखतीत किआरा (Kiara Advani) बोलताना म्हणाली की या कास्टमध्ये ती एकटीच अशी आहे जिला मूल नाही. 

इतकंच नाही तर दिलजीतनेही एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की तो आपल्या कुटुंबाला लाईमलाईटपासून दूर ठेवतो कारण कुटुंबाला त्याच्यामुळे कोणत्याही ट्रोलिंगचा सामना करावा लागू नये. माध्यम रिपोर्ट्नुसार दिलजीतची पत्नी आणि मुलगा अमेरिकेत राहतात. दिलजीतने कधीच त्याच्या लग्नाविषयी भाष्य केलं नाही. 

तर दुसरीकडे किआराच्या त्या व्हिडिओवर काही पंजाबी लोकांनी कमेंट करत लिहिले, "ही फार जुनी बातमी आहे. आम्हाला तर आधीपासूनच हे माहित आहे. 'लक 28' वेळी जो वाद झाला होता तेव्हाच दिलजीत पत्नी आणि मुलासोबत अमेरिकेत निघून गेला होता."

टॅग्स :दिलजीत दोसांझपंजाबसंगीतसोशल मीडिया