दिल तो पागल है या चित्रपटात करिश्मा कपूर नव्हे तर ही अभिनेत्री होती दिग्दर्शकाची पहिली चॉईस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 16:04 IST
जुही चावलाने तिच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. जुहीला नव्वदीच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. ...
दिल तो पागल है या चित्रपटात करिश्मा कपूर नव्हे तर ही अभिनेत्री होती दिग्दर्शकाची पहिली चॉईस
जुही चावलाने तिच्या कारकिर्दीत एकाहून एक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. जुहीला नव्वदीच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानले जाते. जुही फिल्म इंडस्ट्रीत आली, त्यावेळी माधुरी दीक्षितची इंडस्ट्रीत चलती होती. माधुरी एका मागोमाग हिट चित्रपट देत होती. जुही आणि माधुरीने गुलाबी गँग या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. या चित्रपटात जुहीने खलनायिकेची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटात माधुरी पेक्षा जुहीने खूप चांगला अभिनय केला असे अनेकांचे म्हणणे होते. जुही आणि माधुरीची कारकिर्द एकाच काळातील असली तरी त्या दोघींनी गुलाबी गँग या चित्रपटाच्या आधी कधीच एकत्र काम केले नव्हते. माधुरीसोबत काम करण्याची संधी जुहीकडे चालून आली होती. पण तिने त्यासाठी नकार दिला होता. दिल तो पागल है हा यश राज फिल्मसचा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात माधुरी आणि करिश्मा अशा दोन अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. या चित्रपटात निशाची भूमिका करिश्माने साकारली होती. मात्र निशाच्या भूमिकेसाठी करिश्मा ही यश चोप्रा यांची पहिली चॉईस नव्हती. या चित्रपटात जुहीने निशाची भूमिका साकारावी असे यश चोप्रा यांचे म्हणणे असल्याने त्यांनी जुहीला त्यासाठी विचारले देखील होते. पण जुहीने या चित्रपटासाठी नकार दिला होता. केवळ माधुरी या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत असल्याने जुहीने या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला होता. याविषयी जुहीने एका मुलाखतीच्या दरम्यान देखील सांगितले होते. जुहीने सांगितले होते की, दिल तो पागल है या चित्रपटाबाबत मला विचारण्यात आल्यानंतर माधुरी या चित्रपटात असल्याने मी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. डर या चित्रपटातील माझा अभिनय आवडल्यानेच यश चोप्रा यांनी मला दिल तो पागल है या चित्रपटाची ऑफर दिली होती. पण आम्ही दोघेही त्या काळात करियरच्या बाबतीत समान पातळीवर असल्याने मला माधुरीसोबतच्या चित्रपटात दुय़्यम भूमिका साकारायची नव्हती. Also Read : सात महिन्याची गरोदर असताना जुही चावलाने या चित्रपटासाठी केले होते चित्रीकरण