Join us

​‘भल्लालदेव’ राणा दग्गुबतीच्या आगामी सिनेमाचा टीजर तुम्ही पाहिलातं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 13:26 IST

‘बाहुबली2’च्या अभूतपूर्व अशा यशानंतर भल्लालदेव अर्थात राणा दग्गुबती एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. होय, ‘नेने राजू नेने मंत्री’ या तेलगू चित्रपटात राणा दिसणार आहे. आज या चित्रपटाचा टीजर आऊट झाला.

‘बाहुबली2’च्या अभूतपूर्व अशा यशानंतर भल्लालदेव अर्थात  राणा दग्गुबती एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. होय, ‘नेने राजू नेने मंत्री’ या तेलगू चित्रपटात राणा दिसणार आहे. आज या चित्रपटाचा टीजर आऊट झाला. खुद्द राणाने आपल्या सोशल अकाऊंटवर या चित्रपटाचा टीजर पोस्ट केला आहे. यातील राणाचा अंदाज एकदम हटके आहे. यात राणा जोगेंन्द्र नावाच्या एका राजकीय नेत्याची भूमिका साकारतो आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत आहे. राणाच्या पत्नीची भूमिका काजलने साकारली आहे. राणा -काजल या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र येणार आहेत.‘नेने राजू नेने मंत्री’चा टीजी ४० सेकंदांचा आहे. एका कैद्याला फासावर चढवण्यासाठी नेले जात आहे, अशा एका दृश्याने त्याची सुरुवात होते. हा कैदी राणाच असणार, असे तुम्हाला वाटते. पण असे नसतेच मुळी. तेजा दिग्दर्शित या चित्रपटात राणाऐवजी कॅथरिन टेरेसा, नवदीप आणि आशुतोष राणा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट तामिळ, हिंदी आणि मल्याळम अशा तीन भाषांमध्ये रिलीज हसेणार आहे. यावर्षाअखेरिस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल, अशी अपेक्षा आहे. राणा दग्गुबतीच्या ‘बाहुबली2’ ने जगभर यशाच्या पताका फडकवल्या आहेत. कमाईचे म्हणाल तर जगभरात या चित्रपटाने १७०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने आत्तापर्यंत ५०० कोटी रूपयांचा आकडा पार केला आहे. ‘बाहुबली2’मध्ये राणा निगेटीव्ह रोलमध्ये दिसला होता. राणा फक्त एकाच डोळ्याने बघू शकतो.  राणा डाव्या डोळ्याने बघू शकत नाही. लहानपणी राणाला डावा डोळा कोणीतरी डोनेट केला होता. मात्र त्याने तो कधीच बघू शकला नाही. एका तेलगू  रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्वत: राणाने हा खुलासा केला होता.