Join us  

राजपाल यादवच्या पहिल्या पत्नीचे झाले आहे निधन, पाहा त्याच्या पत्नीचे आणि मुलींचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 8:00 AM

राजपाल यादव त्याच्या पत्नी आणि मुलींसोबतचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतो.

ठळक मुद्दे२००२ मध्ये राजपाल यादव त्याच्या ‘द हिरो : लव्ह स्टोरी ऑफ स्पाय’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कॅनडाला गेला होता. त्याठिकाणीच राजपाल आणि राधाच्या कॉमन फ्रेंडने त्यांची भेट घडवून आणली होती.

कॉमिक अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजपाल यादवच्या फिल्मी करिअरची सुरुवात १९९९ मध्ये आलेल्या ‘दिल क्या करे’ या चित्रपटाद्वारे झाली. चित्रपटात मोठी भूमिका न मिळताही त्याने छोट्या-छोट्या भूमिका साकारून स्वत:ची ओळख निर्माण केली. शिवाय बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान बळकट बनविले.

राजपालची पत्नी राधा त्याच्यापेक्षा जवळपास नऊ वर्षांनी लहान आहे. याबाबतचा खुलासा स्वत: राजपालनेच एका मुलाखतीदरम्यान केला होता. ५.२ फूट एवढी उंची असलेल्या राजपालचे राधाबरोबर लव्ह मॅरेज झाले आहे. त्याने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘लोकांना असे वाटते की, ती माझ्यापेक्षा खूपच उंच आहे. परंतु वास्तविकता ही आहे की, ती माझ्यापेक्षा केवळ एका इंचाने मोठी आहे. म्हणजेच माझी उंची ५.२ फूट तर तिची उंची ५.३ इंच आहे. 

२००२ मध्ये राजपाल यादव त्याच्या ‘द हिरो : लव्ह स्टोरी ऑफ स्पाय’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कॅनडाला गेला होता. त्याठिकाणीच राजपाल आणि राधाच्या कॉमन फ्रेंडने त्यांची भेट घडवून आणली होती. दोघांची भेट कॅनडा शहरातील एका कॉफी शॉपमध्ये झाली होती.

या भेटीत दोघांनीही एकमेकांच्या पर्सनल आणि प्रोफेशन लाईफविषयी माहिती शेअर केली होती. त्यानंतर दोघांनी कॅनडात तब्बल दहा दिवस एकत्र घालविले. पुढे राजपाल भारतात परतला. मात्र अशातही दोघांमधील प्रेम कायम राहिले. दोघे फोनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते.

जवळपास दहा महिन्यांनंतर राधाने भारतात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. भारतात शिफ्ट झाल्यानंतर १० जून २००३ मध्ये दोघे विवाह बंधनात अडकले. सध्या या दाम्पत्याला दोन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी हनी चार वर्षांची तर छोटी मुलगी केवळ काही महिन्यांची आहे. राजपाल नेहमीच त्याच्या मुलींसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतो. 

राजपाल यादवचे पहिले लग्न करूणा या महिलेसोबत झाले होते. पण पहिल्याच बाळंतपणात तिचे निधन झाले. त्या दोघांना ज्योती ही मुलगी असून तिचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले. 

टॅग्स :राजपाल यादव