Join us  

सलमान खान, जॅकलिनपेक्षा होतेय तिचीच चर्चा, ‘तेरे बिना’मधील ‘ती’ चिमुरडी आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 11:25 AM

‘तेरे बिना’ या गाण्याच्या अगदी शेवटी एक लहान मुलगी  दिसली. त्यामुळे ही मुलगी कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला. 

ठळक मुद्दे  हे गाणे सलमानच्या  एका मित्राने लिहिलं आहे. पण हे गाणं कोणत्याही सिनेमात फिट बसत नव्हते.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान लॉकडाऊनमुळे त्याच्या फार्महाऊसवर अडकून पडला आहे. पण हो, लॉकडाऊनमध्येही तो प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय. होय, पनवेलच्या फार्म हाऊसवर शूट झालेल्या ‘तेरे बिना’ हे त्याचे गाणे लॉडाऊनच्या काळात  रिलीज झाले आणि चाहते खूश झालेत.  या गाण्यामुळे सलमान आणि त्याच्यासोबत झळकलेली जॅकलिन फर्नांडिस दोघेही चर्चेत आहेत. पण सर्वाधिक चर्चा होतेय ती या गाण्यात सल्लू भाईच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारणा-या एका चिमुरडीची.  ती बालकलाकार नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच इच्छा आहे. तर आज तिच्याबद्दलच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सलमानचे ‘तेरे बिना’ या गाण्यात सलमान आणि जॅकलीन यांची ऑनस्क्रीन रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली. अवघ्या काही वेळातच हे सिंगल तुफान हिट सुद्धा झाले़ या गाण्याच्या अगदी शेवटी एक लहान मुलगी  दिसली. त्यामुळे ही मुलगी कोण असा प्रश्न सर्वांनाच पडला. तर ही मुलगी आहे सियैना रॉबीशन. बॉलिवूड डॉट कॉमने दिलेल्या वृतानुसार सियैना ही सलमानची चांगली मैत्रीण आणि अभिनेत्री वलुचा डिसूझा हिची लहान मुलगी आहे.

 ‘तेरे बिना’ हे रोमँटिक साँग सलमान खानने स्वत: गायले असून या गाण्यात सलमान आणि जॅकलिनचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. हे संपूर्ण गाणे सलमानच्या पनवेल फार्म हाऊस आणि आसपासच्या परिसरात शूट करण्यात आले आहे. गाण्याचा  व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

  हे गाणे सलमानच्या  एका मित्राने लिहिलं आहे. पण हे गाणं कोणत्याही सिनेमात फिट बसत नव्हते. त्यामुळे सलमानने हे गाणे  शूट करून रिलीज करण्याचा प्लान बनवला. पनवेलच्या फार्महाऊसवर  उपलब्ध असेलेले सामान आणि नॅचरल लाइटमध्ये हे गाण्से शूट करण्यात आले आहे. या गाण्याच्या  शूटिंगसाठी त्यांना 4 दिवस लागले.

टॅग्स :सलमान खान