Join us  

कमांडोचे तेरा बाप आया हे गाणे तुम्ही ऐकले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2019 6:00 AM

कमांडो या चित्रपटाचे तेरा बाप आया हे प्रमोशनल साँग असून भारतातील लोकांच्या स्पिरिटविषयी हे गाणे असणार आहे.

ठळक मुद्देया गाण्याला संगीत विक्रम मोन्ट्रोसने दिले असून हे गाणे फरहाद भिवंडीवाला आणि विक्रम मोन्ट्रोसे यांनी गायले आहे. हे गाणे फरहाद भिंडीवालाने गायले आहे.

विपुल अमृतलाल शहा यांच्या कमांडो 3 या चित्रपटात रसिकांना एक रॅप साँग ऐकायला मिळणार आहे. आदित्य दत्त यांचे दिग्दर्शन असलेल्या कमांडो या चित्रपटाचे तेरा बाप आया हे प्रमोशनल साँग असून भारतातील लोकांच्या स्पिरिटविषयी हे गाणे असणार आहे. कोणत्याही गोष्टीला भारतीय कशाप्रकारे तोंड देतात हे रसिकांना या गाण्याद्वारे जाणून घेता येणार आहे. 

 

तेरा बाप आया हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार यात काहीच शंका नाही. या गाण्याला संगीत विक्रम मोन्ट्रोसने दिले असून हे गाणे फरहाद भिवंडीवाला आणि विक्रम मोन्ट्रोसे यांनी गायले आहे. हे गाणे फरहाद भिंडीवालाने गायले आहे. या चित्रपटात नायकाने वाईट गोष्टींवर कशाप्रकारे मात केली हे रसिकांना या गाण्याद्वारे जाणून घेता येणार आहे. 

या गाण्याचा संगीतकार विक्रम मोन्ट्रोसे सांगतो, हे गाणे माझ्यासाठी खूप खास आहे. विपुल सर आणि आदित्य यांना कशाप्रकारचे गाणे हवे आहे हे मला माहीत असल्याने मला गाणे बनवताना त्याची मदत झाली. मला स्वतःला अशाप्रकारची गाणी आवडत असल्याने ही गाणी बनवणे एन्जॉय केले. या गाण्यातील फरहादची एनर्जी थक्क करणारी आहे. हे गाणे रसिक डोक्यावर घेतील याची मला खात्री आहे.

या गाण्याविषयी फरहाद भिंडीवाला सांगतो, तेरा बाप आया हे गाणे मस्त जमून आले आहे. हे गाणे रसिकांना प्रचंड आवडेल अशी आम्हाला खात्री आहे. हे गाणे लिहायला आणि गायला खूपच मजा आली. मला नेहमीच ॲक्शन चित्रपट खूप आवडतात. त्यामुळे कमांडो सारख्या प्रसिद्ध चित्रपटाचा मला भाग व्हायला मिळाले आणि त्यातही विद्युत जामवालसाठी मला गायला मिळत आहे त्याबद्दल मी प्रचंड खूश आहे. 

या चित्रपटाचा नायक विद्युत जामवाल सांगतो, तेरा बाप आया हे गाणे खूप चांगल्याप्रकारे बनवण्यात आले आहे. कोणत्याही गोष्टीची पर्वा न करणाऱ्या तरुणांचे प्रतिनिधित्व हे गाणे करणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य दत्त सांगतात, नायक आणि खलनायक यांच्यातील बाप कोण आहे हे दर्शवणारे हे गाणे आहे.

कमांडो 3 या चित्रपटात विद्युत जामवाल, अदा शर्मा, अंगिरा धर आणि गुलशन दैवय्या यांच्या मुख्य भूमिका आहेत.

टॅग्स :विद्युत जामवालकमांडो