Join us

​काय म्हणता, प्रियांका चोप्राची जागा दीपिका पादुकोणने घेतली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 15:31 IST

फरहान अख्तरबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. होय, फरहान ‘डॉन’ची पुढील सीरिज अर्थात ‘डॉन3’ घेऊन येतोय, अशी ही चर्चा ...

फरहान अख्तरबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. होय, फरहान ‘डॉन’ची पुढील सीरिज अर्थात ‘डॉन3’ घेऊन येतोय, अशी ही चर्चा आहे.  ‘डॉन3’च्या कास्टिंगमध्ये कुठलाही बदल असणार नाही, असेही बोलले गेले होते. पण आता नवी खबर आहे. होय, ‘डॉन3’मध्ये एक बदल दिसणार आहे. हा बदल कुठला तर ‘डॉन3’मध्ये प्रियांका चोप्रा नाही तर तिच्याजागी दीपिका पादुकोण असणार आहे. सूत्रांचे मानाल तर ‘डॉन3’मध्ये प्रियांका नसणार हे पक्के आहे. कारण प्रियांका सध्या बॉलिवूडमध्ये नाही तर हॉलिवूडमध्ये तळ ठोकून आहे. बॉलिवूडचे अनेक प्रोजेक्ट आत्तापर्यंत तिने नाकारले आहेत. त्याचमुळे ‘डॉन’ सीरिजच्या मेकर्सनी नव्या भागासाठी एक नवा चेहरा घेण्याचे ठरवले आहे आणि हा चेहरा दीपिकाचा आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटासाठी प्रियांकाऐवजी दीपिकाला अ‍ॅप्रोच केले गेले आहे. ही बातमी खरी ठरली तर शाहरूख आणि दीपिकाची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अर्थात सध्या याबाबत नुसती चर्चा आहे.‘डॉन’ सीरिजचे निर्माते रितेश सिधवानी यांनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. सध्या आम्ही स्क्रिप्टवर काम चालवले आहे आणि स्क्रिप्ट होईपर्यंत स्टारकास्टची घोषणा होणार नाही, असे रितेश यांनी म्हटले आहे.ALSO READ : दीपिका पादुकोणला पछाडत प्रियांका चोप्रा पुन्हा बनली ‘सेक्सिएस्ट एशियन वूमन’!सन २००६ मध्ये शाहरूख व प्रियांका स्टारर ‘डॉन’ आला होता. यानंतर २०११ मध्ये ‘डॉन2’ प्रदर्शित झाला होता. हे दोन्ही चित्रपट हिट ठरले होते. त्यामुळेच या हिट चित्रपटाचा तिसरा पार्ट आणण्यास मेकर्स उत्सूक आहेत. शाहरूख व दीपिकाच्या जोडीबद्दल सांगायचे तर या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या ‘आॅल टाईम फेवरेट’ जोडीपैकी एक आहे. ही जोडी हिट मानली जाते. यापूर्वी ‘ओम शांती ओम’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ अशा चित्रपटात ही जोडी दिसली आहे. तूर्तास दीपिका ‘पद्मावती’ आणि हनी तेहरानच्या अन्य एका चित्रपटात बिझी आहे तर शाहरूख आनंद एन रायच्या सिनेमात व्यस्त आहे.