Join us  

घटस्फोटानंतर दिया मिर्झाला या गोष्टींना द्यावे लागतेय तोंड, तिनेच दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 4:12 PM

घटस्फोटानंतर आयुष्यातील अनेक गोष्टी बदलतात अशी कबुली दियाने एका मुलाखतीत नुकतीच दिली आहे.

ठळक मुद्देदिया सांगते, माझ्या अवतीभवती असलेले सगळेच लोक हे उच्चशिक्षित आहे. पण तरीही घटस्फोट झाल्यानंतर त्यांना भेटताना माझ्याविषयी त्यांना खूप वाईट वाटत असल्याचे, माझ्याविषयी ते खूप सहानभूती दाखवतात असल्याचे मला जाणवते.

दिया आणि साहिल संघा हे दोघेही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. त्या दोघांची पहिली ओळख 2009 मध्ये झाली होती. एका सिनेमाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली होती. साहिल एका चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन दियाच्या घरी गेला होता. त्या छोट्याशा भेटीत साहिलला पाहून दियाच्या मनाची तार छेडली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. ब्रुकलेन ब्रिजवर साहिलने दियाला प्रपोज केले होते. अनेक वर्ष नात्यामध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2014 मध्ये लग्न केले होते. पण गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्या दोघांनी घटस्फोट घेतला. 

घटस्फोट झाल्यानंतर एका महिलेकडे पाहाण्याचा लोकांचा दृष्टीकोन हा खूप बदलतो असे दिया मिर्झाने पिंकव्हिलाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. दिया सांगते, माझ्या अवतीभवती असलेले सगळेच लोक हे उच्चशिक्षित आहे. पण तरीही घटस्फोट झाल्यानंतर त्यांना भेटताना माझ्याविषयी त्यांना खूप वाईट वाटत असल्याचे, माझ्याविषयी ते खूप सहानभूती दाखवतात असल्याचे मला जाणवते. त्यांच्या नजरेतूनच मला ही गोष्ट कळते. खरे तर या गोष्टी अधिक त्रासदायक असतात. काही वेळा लोक मला सांगतात की, मला आता अधिक स्ट्राँग व्हायची गरज आहे. सगळ्या गोष्टी विसरून मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मला त्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की, मी माझा मार्ग स्वीकारला आहे. तुम्ही देखील तुमचा मार्ग स्वीकारा...

पुढे दिया सांगते, घटस्फोटीत महिला हा ठपका तुमच्यावर बसतो. तसेच तुम्हाला तडजोड करायची नसल्याने तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असतो असे देखील काहींना वाटते. तुमच्या आयुष्यात तुम्हाला तडजोड करावी लागते ही गोष्ट मी देखील मान्य करते. पण त्याला पण काही मर्यादा असल्या पाहिजेत असे मला वाटते. 

टॅग्स :दीया मिर्झा